यापुढे केवळ ग्रॅण्ड स्लॅम खेळणार : क्वितोव्हा

    दिनांक :15-Oct-2020
|
प्राग,
यंदाचे ग्रॅण्ड स्लॅम टेनिस मोसम अतिशय यशस्वी राहिल्यामुळे दोनवेळची विम्बल्डन विजेती पेत्रा क्वितोव्हा आनंदित झाली आहे. त्यामुळेच ती गंमतीने म्हणाले की, आता यापुढे मी केवळ ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धाच खेळणार आहे.
 
PETRA KWITOWA_1 &nbs 
 
जागतिक महिला टेनिस क‘मवारीत 8 व्या स्थानावर असलेल्या 30 वर्षीय पेत्राने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली, अमेरिकन ओपनमध्ये तिने अंतिम सोळामध्ये स्थान मिळविले होते आणि गत आठवड्यात संपलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत तिला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.