ख्रिस गेलकडून धमाकेदार कामगिरीची आशा

    दिनांक :15-Oct-2020
|
- मॅक्सवेलच्या जागी गेलला संधी मिळण्याची शक्यता

आजचा सामना
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्ज इलेव्हन पंजाब

शारजाह,
इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी तिसर्‍या क्रमांकावरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना तळाच्या स्थानी असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार आहे. अन्नविषबाधेतून बरा झालेला ख्रिस गेल यंदाच्या मोसमात प्रथमच खेळणार आणि पदार्पणातच धडाकेबाज कामगिरी बजावेल, अशी आशा किंग्ज इलेव्हन पंजाबला आहे.
 
 
CHRIS GAYLE-1_1 &nbs 
 
गुणतालिकेत सध्या मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रत्येकी 10 गुण असून सरस धावगतीच्या आधारावर हे तीन संघ क‘मशः पहिल्या तीन स्थानावर आहे. कोलकाताचा संघ 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर हैदराबाद, चेन्नई व राजस्थान संघांचे प्रत्येकी 6 गुण असून ते पाचवे ते सहाव्या क‘मांकावर आहे.
 
 
पंजाबचा संघ अष्टपैलू कामगिरी बजावण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्यांनी आपल्या आवाक्यातील सामने गमावले. पंजाबने आतापर्यंत सातपैकी सहा सामने गमावले. पंजाबने केवळ आरसीबीविरुद्ध एकमेव विजय नोंदविला असून आता हाच विजय त्यांच्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण करू शकतो. मात्र तिकडे गत 24 सप्टेंबर रोजी झालेल्या या सामन्यानंतर बंगळुरुचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे.
 
 
शारजाहची खेळपट्टी हळूहळू मंदावत असली तरी ख्रिस गेलसार‘या फलंदाजाला षट्कारांची आतषबाजी करण्यासाठी हे छोटे मैदान त्याच्यासाठी आदर्शवत आहे. तथापि, या स्पर्धेत प्रारंभापासून आतापर्यंत न खेळलेल्या ख्रिस गेलला अगदी पहिल्या चेंडूपासून धमाकेदार प्रदर्शन करणे इतके सोपे राहणार नाही. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तो गत दोन सामन्यात खेळू शकला नाही. आता त्याची प्रकृती ठिक झाली असून आता त्याला कोणत्या खेळाडूच्या जागी संघात स्थान दिले जाते, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 
 
अद्याप तडाखेबंद फलंदाजी न करणारा ग्लेन मॅक्सवेल हा एक पर्याय असू शकतो किंवा विदेशी गोलंदाज किंवा भारतीय खेळाडूला विश्रांती देऊन त्याला संघात स्थान मिळू शकते.
 
 
किंग्ज इलेव्हन पंजाब गुणतालिकेत तळाच्या स्थानी असले तरी त्यांच्याकडे सर्वाधिक धावा काढणारे लोकेश राहुल (387) व त्याचा सलामीचा जोडीदार मयंक अग‘वाल (337) आघाडीचे फलंदाज आहेत. मोहम्मद शमी व रवी बिस्नोई वगळता कोणत्याही गोलंदाजाने मनोबल वाढविणारी गोलंदाजी केलेली नाही. बर्‍याच पर्यायांचा प्रयत्न करूनही पंजाब संघाला समतोल साधता आला नाही.
 
 
त्यातुलनेत बंगळुरूने गत सामन्यात प्रेरणादायी फलंदाजी करीत आपली आगेकूच कायम राखली आहे. बर्‍याच वर्षांनंतर प्रथमच त्यांच्या गोलंदाजीच्या समस्येचे निराकरण झाल्याचे दिसत आहे. वॉशिंग्टन सुंदर व युजवेंद्र चहल ही त्यांची फिरकी जोडी प्रभावी ठरली आहे, तर दुखापतीतून सावरलेल्या ख्रिस मॉरिसच्या पुनरागमनामुळे वेगवान गोलंदाजीसुद्धा बळकट झालेली आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात अ‍ॅरोन फिंचलाही सूर गवसला आहे. आता फिंचसह कर्णधार कोहली, एबी डीव्हिलियर्स व देवदत्त पडिक्कल हे आरसीबीचे चारही अव्वल फलंदाज कोणत्याही प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरू शकतात.
 
 
- प्रतिस्पर्धी संघ -
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), अ‍ॅरोन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरू उडाना, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरतसिंग मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे व अ‍ॅडम झाम्पा.
 
 
किंग्ज इलेव्हन पंजाब : लोकेश राहुल, हरप्रीत ब‘ार, ईशान पोरेल, मनदीप सिंग, जेम्स निशाम, तजिंदर सिंग, ख्रिस जॉर्डन, करूण नायर, दीपक हुड्डा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सर्फराज खान, शेल्डन कॉट्रिल, मयंक अग‘वाल, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदिशा सूचित, कृष्णप्पा गौतम, हर्डस विल्जोन व सिमरन सिंग.