तुषार देशपांडेची धवनकडून प्रशंसा

    दिनांक :15-Oct-2020
|
- रबाडा, नॉर्टिज महान गोलंदाज
दुबई,
रबाडा व नॉर्टिज हे महान गोलंदाज आहे. रबाडा एक दिग्गज आहे. जेव्हा ते भागीदारी म्हणून गोलंदाजी करतात, तेव्हा ते फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतात. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनेसुद्धा पदार्पणात चमकदार कामगिरी केली. विशेषतः अशा प्रचंड दडपणाखाली त्याने डोके शांत ठेवून प्रभावी मारा केला. त्याने बेन स्टोक्सचा महत्त्वपूर्ण बळी मिळविला, अशा शब्दात सलामी फलंदाज शिखर धवनने गोलंदाजांची प्रशंसा केली.
 
 
TUSHAR DESHPANDE_1 & 
 
बुधवारी आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 13 धावांनी रोमांचक विजय मिळविला. या विजयात रबाडा, नॉर्टिज व तुषार देशपांडेने अचूक वेगवान मारा करून दिल्लीला विजय मिळवून दिला. कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग‘स्त झाल्यानंतर शिखर धवनने या सामन्यात तात्पुरते संघाचे कर्णधारपद सांभाळले.
 
 
कॅगिसो रबाडा व अ‍ॅनरिच नॉर्टिज या दोन वेगवान गोलदांजांच्या हातात चेंडू आला की, ते आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतात, यावर दिल्ली कॅपिटल्समधील सवंगड्यांचा नेहमीच विश्वास राहिला आहे. नॉर्टिजने दीडशे कि.मी. ताशी वेगाने गोलंदाजी केली, असे तो म्हणाला.
 
 
तुषार अतिशय शांत स्वभावाचा आहे, मात्र सराव सत्रात त्याने कठोर परिश्रम घेतले. अखेरच्या षटकातसुद्धा तुषार आपल्या व्यूहरचनेबाबत स्पष्ट होता. त्याने असे केलेले पाहून खरोखरच आनंद झाला, असेही तो म्हणाला. तुषार देशपांडेने 37 धावात 2 बळी, नॉर्टिजने 33 धावात 2 बळी, तर रबाडाने 28 धावात 1 बळी मिळविला.
 
 
25 वर्षीय तुषार देशपांडे मुंबईचा असून 2016-17 मध्ये त्याने रणजी करंडक प्रथम श्रेणी कि‘केटमध्ये पदार्पण केले. 2018-19 मध्ये तो पहिल्यांदा मुंबईकडून विजय हजारे चषक कि‘केटमध्ये खेळला. लिस्ट ए कि‘केटमध्ये त्याने उपांत्यपूर्व सामन्यात पाच बळी टिपण्याची किमया केली होती. 2019-20 मध्ये दुलिप करंडकासाठी त्याची भारत ब्ल्यू संघात निवड झाली होती. यंदाच्या आयपीएल मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्सने तुषारला 20 लाख रुपयांत खरेदी केले.