दिग्गज खेळाडूंना कोरोनाची लागण

    दिनांक :15-Oct-2020
|
नवी दिल्ली,
गत मार्च महिन्यात जगभरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढला, तेव्हा जगातील सर्व क्रीडा प्रकार थांबले होते, परंतु अलिकडे जैव-सुरक्षित नियमाचे पालन करीत काही क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असली तरीही काही दिग्गज खेळाडूंना कोरोनापासून दूर राखण्यात अपयश आले आहे.
 
RONALDO_1  H x  
 
जागतिक फुटबॉल क्षेत्रातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला कोरोनाची लागण झाली आहे. 35 वर्षीय रोनाल्डोला लक्षणे नसलेला कोरोना झाला असून त्याला तत्काळ पोर्तुगालच्या राष्ट्रीय लीगमधून वगळण्यात आले. तो सध्या विलगीकरणात आहे. फ्रान्सविरुद्धचा सामना गोलशून्यने बरोबरीत राहिल्यानंतर रोनाल्डोला कोरोनाची लागण झाल्याचे घोषित करण्यात आले.
 
 
जगातला अव्वल क‘मांकाचा अमेरिकेचा गोल्फपटू डस्टीन जॉन्सन याचा मंगळवारी कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. सप्टेंबर महिन्यात अमेरिकन ओपन गोल्फ स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर आता त्याने लास वेगास येथे होणार्‍या सीजे चषक गोल्फ स्पर्धेतून माघार घेतली आहे.
 
 
एसी मिलान फुटबॉल क्लबचा आक्रमक खेळाडू झाल्टन इब्रामोव्हिचला गत 24 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. मात्र सध्या त्याची प्रकृती उत्तम आहे. तो आगामी 17 ऑक्टोबर रोजी इंटर मिलानविरुद्धच्या सामन्यात डर्बी संघाकडून खेळण्यास उपलब्ध आहे.
 
 
ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेमार यालासुद्धा सप्टेंबरमध्ये कोरोनाची लागण झाली होती. दहा दिवसांच्या विलगीकरणानंतर त्याची चाचणी नकारात्मक आली. तो पॅरीस सेंट जर्मन क्लबमध्ये प्रशिक्षण सत्रात सहभागी झाला. कोरोना पळाला, मी सरावासाठी परतलो, असे ट्विट करीत नेमारने आनंद व्यक्त केला.
 
 
प्रथम विश्वमानांकित पुरुष टेनिसपटू नोवाक जोकोविच व त्याची पत्नी येलेना जोकोविच हे जून महिन्यात कोरोनाबाधित झाल्याचे आढळले होते. त्याने सर्बिया येथे आयोजित स्पर्धेत भौतिक दूरतेच्या नियमाचे पालन केले नाही, परिणामी त्याला कोरोनाची लागण झाली होती.
 
 
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिलाही कोरोनाची लागण झाली होती, परंतु लक्षणे नसलेला कोरोना होता. 26 वर्षीय विनेश टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. यावर्षीच तिला देशाचा सर्वोच्च क‘ीडा सन्मान खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसह सहा हॉकीपटूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला होता. ऑगस्ट महिन्यात बंगळुरुमध्ये त्यांची चाचणी घेण्यात आली होती. जून महिन्यात पाकिस्तानचा माजी कि‘केटपटू शाहीद आफि‘दी यालासुद्धा कोरोनाची बाधा झाली होती.