परिपूर्ण सांघिक प्रयत्नांचा विजय : धोनी

    दिनांक :15-Oct-2020
|
दुबई,
सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आम्हाला अशाच निकालाची अपेक्षा होती. हा विजय म्हणजे जवळपास परिपूर्ण सांघिक प्रयत्न आहे, अशा शब्दात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या सवंगड्यांची प्रशंसा केली.
 
MS DHONI_1  H x 
 
मंगळवारी चेन्नईने 20 धावांनी विजय मिळविला. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 167 धावांचा बचाव करताना चेन्नई संघातील प्रत्येक खेळाडूंनी योगदान दिले. आठ सामन्यातील हा त्यांचा केवळ तिसरा विजय ठरला आहे. या सामन्यात ते एका वेगळ्या व्यूहरचनेसह मैदानावर उतरले व योग्यरित्या अंमलात आणली.
 
 
सरतेशेवटी महत्त्वाचे म्हणजे आम्हाला दोन गुण मिळाले. मला वाटते की आम्ही फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजांनी परिस्थिती उत्कृष्टपणे हाताळली. 160 सारखी धावसं‘या ही आपल्या पहिल्या सहा षटकांच्या खेळावर अवलंबून असते. वेगवान गोलंदाज तसेच फिरकीपटूंनीसुद्धा आपल्या गोलंदाजीची कमाल दाखविली. एकंदरीतच काय हा जवळपास एक परिपूर्ण सामना होता, असे तो म्हणाला.