कोलकाताविरुद्ध मुंबईला विजयाचा विश्वास

    दिनांक :16-Oct-2020
|
- सुनील नरेनच्या समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह

आजचा सामना
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स

अबुधाबी,
इंडियन प्रीमियर लीग मोसमात शुक्रवारी गतविजेता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. मजबूत फलंदाजीची फळी व जबरदस्त प्रभावी गोलंदाजीच्या आधारावर मुंबईला कोलकात्याविरुद्ध निश्चित विजय मिळेल, असा संघव्यवस्थापनाला विश्वास आहे.
 

KOLKATA_1  H x  
 
आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स सध्या 10 गुणांसह दुसर्‍या स्थानावर, तर कोलकाता 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. मुंबईने अलिकडेच हॅट्ट्रिकसह चार विजयाची नोंद केली आहे, तर तिकडे कोलकातासमोर अनेक समस्या आहे. गत सामन्यात कोलकात्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 82 धावांनी पराभूत केले. मुंबई आपल्या अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात कोणताही बदल करण्याची शक्यता नाही, मात्र कोलकात्या संघासमोर प्रमुख फिरकीपटू सुनील नरेनला खेळवायचे की नाही, हा प्रश्न उभा ठाकला आहे. अलिकडेच सुनील नरेनच्या नियमबाह्य गोलंदाजीबाबतचा अहवाल समोर आला आहे. तो बंगळुरुविरुद्धच्या सामन्याला मुकला असला तरी त्याचे वादग‘स्त गोलंदाजीच्या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाली काढावा, अशी आशा संघाने व्यक्त केली आहे.
 
 
जर सुनील नरेन पुन्हा एकदा या सामन्याला मुकला, तर मुंबई इंडियन्सला शेख झायेद स्टेडियमवर धुव्वाधार फलंदाजी करण्याची संधी राहील. या मोसमात कर्णधार रोहित शर्माने (216) आपली दोन अर्धशतके याच स्टेडियमवर झळकावलीत. आता सामन्यातही तो कोणत्याही आक‘मणाला समर्थपणे तोंड देऊ शकतो व कोलकात्याविरुद्ध फलंदाजीचा मनसोक्त आनंद लुटू शकतो. गत सामन्यातही रोहितच्या 80 धावांच्या जोरावर मुंबईने कोलकात्यावर 49 धावांनी विजय नोंदविला होता.
 
 
रोहितशिवाय मुंबईची अव्वल व मधली फळी उत्तम फॉर्मात आहे. क्विंटन डिकॉक (191 धावा) व सूर्यकुमार यादव (233) आपल्या फलंदाजीची लय कायम राखतील अशी आशा आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने केलेली खेळीसुद्धा लक्षवेधक ठरली होती, परंतु झारखंडच्या या इशानला आपल्या छोट्या खेळीला मोठ्या खेळीमध्ये परिवर्तित करण्याची गरज आहे.
 
 
मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या व कायरन पोलार्डच्या कामगिरीवर खूश आहे. हे त्रिकुटांमध्ये कोलकात्या आक‘मणाला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे. शिवाय सोबतीला ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह व जेम्स पॅटिन्सनसारखी मजबूत वेगवान गोलंदाजी विभाग आहे. राहुल चहर व कृणाल पुन्हा एकदा कोलकात्याची फलंदाजी उद्ध्वस्त कर्याचा प्रयत्न करतील.
 
 
तिकडे कोलकाता नाईट रायडर्सची कमकुवत बाजू म्हणजे त्यांच्या फलंदाजांममध्ये सातत्याचा अभाव आहे. कोलकात्याचे फलंदाज आपल्या क्षमतेनुसार खेळत नाही. युवा व प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल, इंग्लंडचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन, नितीश राणा व कर्णधार दिनेश कार्तिक हे दमदार फलंदाज आहेत, परंतु त्यांना कठीण परिस्थितीतून संघाला बाहेर काढणे जमले नाही. आता शुक‘वारच्या सामन्यात दिग्गज खेळाडू हे राहुल त्रिपाठी व टॉम बॅण्टन यांच्यावरील दडपण कमी करतील, अशी संघव्यवस्थापनाला आशा आहे.
 
 
कोलकात्याची गोलंदाजीची भिस्त पॅट कमिन्स, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, वरुण चक‘वर्ती यांच्यावर आहे.
 
- प्रतिस्पर्धी संघ -
कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), इयॉन मॉर्गन, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, शुभमन गिल, सिद्धेश लाड, अली खान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, प्रसिध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, वरुण चक‘वर्ती, आंद्रे रसेल, ख्रिस ग‘ीन, एम. सिद्धार्थ, सुनील नरेन, निखिल नाईक व टॉम बॅण्टन.
 
 
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुळकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, इशान किशन, मिचेल मॅक्लेगन, मोहसीन खान, नॅथन काऊल्टर-नाईल, बलवंत राय, क्विंटन डिकॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेर्फन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव व ट्रेंट बोल्ट.