यवतमाळात 45 जण कोरोनामुक्त

    दिनांक :17-Oct-2020
|
- 36 नव्याने कोरोनाग्रस्त 
यवतमाळ, 
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षासह विविध कोविड केंद्रांमध्ये भरती असलेल्या 45 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासांत 36 जण नव्याने बाधित आले आहेत.
 
 
corona ad_1  H
 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासांत एकूण 425 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 36 नव्याने बाधित आणि 389 जणांचे अहवाल कोरोनामुक्त आले आहेत.
 
 
जिल्ह्यात सद्यस्थितीत 475 कोरोनाग‘स्त असून आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची सं‘या 9374 झाली आहे. शनिवारी 45 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण सं‘या 8444 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 297 मृत्युंची नोंद आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 84,534 स्राव नमुने पाठविले असून यापैकी 83,859 चे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 74,485 नागरिकांचे नमुने आतापर्यंत कोरोनामुक्त आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.