अंबा व एकविरा देवीचे दर्शन आता टिव्ही व फेसबुकवरून

    दिनांक :17-Oct-2020
|
तभा वृत्तसेवा
अमरावती,
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साजरा होणार असला तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्याला प्रचंड मर्यादा आल्या आहे. अंबा व एकवीरा देवी मंदिरात शनिवारी सकाळी घटस्थापना होणार आहे. अन्य धार्मिक कार्यक्रमही सर्व नियमांचे पालन करुन आयोजित करण्यात आले आहे.

dav_1  H x W: 0
 
विदर्भाची कुलस्वामिनी अंबा व एकवीरा देवीच्या दर्शनाला नवरात्रात लाखो भक्त अमरावतीला येतात. नवरात्राच्या नऊ दिवसात मोठी यात्रा असते. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली असून मंदिर बंद असल्याने भक्तांना दोनही देवींचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यावर बंदी आहे.
 
स्थानिक वाहिण्या व फेसबुकच्या माध्यमातून भक्तांना देवींचे दर्शन होणार आहे. घटस्थापनेसह अन्य सर्व धार्मिक कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही होणार आहे. त्याची तयारी संस्थानच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. याशिवाय जिल्ह्यात 1 हजार 600 स्थानांवर सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने श्री दुर्गेची स्थापना होणार आहे.
 
अटी व शर्तीच्या आधारावर या मंडळांना उत्सव साजरा करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मंडळांनी सुद्धा संकटाची स्थिती लक्षात घेऊन उत्सवाचे स्वरुप आटोपशीर ठेवले आहे. नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक तिथे बंदोबस्त लावला आहे.