हसीना मलिक 'मॅडम सर'मालिकेच्‍या कलाकारांना सतत करते प्रेरित

    दिनांक :17-Oct-2020
|
मुंबई,
सोनी सबने या वर्षाच्‍या सुरूवातीला सादर केलेली हलकी-फुलकी मूल्याधारित मालिका 'मॅडम सर'सह प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सुरूच ठेवले आहे. मालिका 'मॅडम सर' टॅगलाइन 'कुछ बात है क्‍यूंकी जजबात है'सह चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्‍या दृष्‍टीकोनातून सामाजिक समस्‍यांचे निराकरण करते. या महिला अधिकारी प्रत्‍येक आव्‍हानाचा स्‍वीकार करतात आणि सद्भावनेने केसेसचे निराकरण करतात.
मनापासून पोलिस कर्तव्‍य बजावण्‍यावर दृढ विश्‍वास असलेली हसीना मलिक, एस.एच.ओ. (स्‍टेशन हाऊस ऑफिसर) ही तरूण, हुशार व आदर्श महिला आहे. तिचा संवेदनशीलपणे पोलिस कर्तव्‍य बजावण्‍यावर विश्‍वास आहे. तिला 'मॅडम मलिक' म्‍हणून देखील बोलले जाते. या मालिकेमध्‍ये एस.एच.ओ. हसीना मलिकच्‍या भूमिकेत गुल्‍की जोशी, सब इन्‍स्‍पेक्‍टर करिष्‍मा सिंगच्‍या भूमिकेत युक्‍ती कपूर, हेड कॉन्‍स्‍टेबल पुष्‍पाच्‍या भूमिकेत सोनाली नाईक आणि कॉन्‍स्‍टेबल संतोषच्‍या भूमिकेत भाविका शर्मा हे कलाकार आहेत.हसीना मलिक आणि तिला इतरांपेक्षा वरचढ ठरवणा-या बाबींबाबत सांगताना युक्‍ती कपूर, सोनाली नाईक व भाविका शर्मा यांनी मॅडम मलिकसाठी त्‍यांचे प्रेम व्‍यक्‍त केले.
 

j _1  H x W: 0  
करिष्‍माची भूमिका साकारणारी युक्‍ती कपूर म्‍हणाली, ''हसीना व करिष्‍मा या दोघीही पूर्णत: वेगवेगळ्या आहेत. करिष्‍मा काहीशी कडक शिस्‍तीची आहे. पण हसीना मलिक सोबती असल्‍यामुळे करिष्‍माने मॅडम मलिकच्‍या पोलिस कर्तव्‍याचा आदर करण्‍यास सुरूवात केली आहे. हसीनाची कामाप्रती आवड प्रशंसनीय आहे. माझी भूमिका तिच्‍यापेक्षा भिन्‍न असली तरी त्‍यांच्‍यामध्‍ये उत्तम साहचर्य आहे".
पुष्‍पाची भूमिका साकारणारी सोनाली नाईक म्‍हणाली,''मी हसीना मलिकचे न्‍याय देण्‍याप्रती तिच्‍या प्रयत्‍नांसाठी कौतुक करते. तिचा नेहमीच कोणत्‍याही केसचे निराकरण करण्‍यासाठी योग्‍य दृष्‍टीकोनावर विश्‍वास असतो. तिची वागणूक व विश्‍वास या गुणांमुळेच चारही महिलांमध्‍ये एकजूट आहे. माझी भूमिका पुष्‍पा ही सर्वांमध्‍ये अनुभवी आहे आणि निवृत्त होण्‍यापूर्वी मोठे काहीतरी घडण्‍याची वाट पाहत आहे. एक लीडर म्‍हणून ती कोणत्‍याही स्थितीमध्‍ये सर्वोत्तमता आणण्‍यासाठी प्रत्‍येकाला प्रोत्‍साहित करते".
संतोषची भूमिका साकारणारी भाविका शर्मा म्‍हणाली,''मालिकेमधील माझी भूमिका संतोषी ही महिला पोलिस थानाची सर्वात तरूण सदस्‍य आहे. ती प्रत्‍येक पायरीवर तिच्‍या सहका-यांकडून शिकत आहे. ती नेहमीच हसीनाकडून प्रेरणा घेते आणि तिची हसीनासारखेच बनण्‍याची इच्‍छा आहे. उत्तम लीडर असलेल्‍या हसीना मलिकमध्‍ये उत्तम संवेदनशीलता व प्रेमळपणे कोणत्‍याही स्थितीमध्‍ये काम करण्‍याची समर्पितता हा सर्वात मोठा गुण आहे. ती दृढ तत्त्वांसह आत्‍मविश्‍वासू आहे. ती धाडसी मन असलेली टीम प्‍लेअर आहे.