वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्यास परवाना होणार रद्द

    दिनांक :17-Oct-2020
|
- मोटार वाहन कायद्यातील तरतुदी कठोर
नवी दिल्ली, 
केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्यातील नवीन तरतुदींनुसार वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातल्यास परवाना बरखास्त होण्यासह वाहनाची नोंदणीही रद्द होण्याची शक्यता आहे. याशिवाय व्यावसायिक प्रवासी वाहनांमध्ये नोंदणी होऊनही प्रवाशांना घेण्यास नकार देणे, त्यांना चुकीच्या ठिकाणी उतरवणे, गैरव्यवहार करण्याबाबतही मोठी कारवाई होऊ शकते.
 

traffic police_1 &nb 
 
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये नवीन तरतुदी केल्या असून, 1 ऑक्टोबर 2020 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
 
 
पोलिसांनी एखाद्या चालकाला थांबवल्यानंतर त्याच्या वर्तनावर पुढील अनेक गोष्टी अवलंबून असेल. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांशी हुज्जत घालणे, वाहन न थांबवण्यासाठी कठोर कारवाई होऊ शकते. ट्रकचालकांनी केबिनमधून प्रवासी वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाई अपेक्षित आहे. नशेत वाहन चालवणे, धूम्रपान करणे अशा प्रकारांमुळेही चालक अडचणीत येऊ शकतो. दरम्यान, नव्या कायद्यात गाडी चालवताना भ्रमणध्वनीवर गुगल मॅपचा वापर करण्यासाठीच परवानगी देण्यात आली आहे.
 
 
कागदपत्रांची चिंता नको
वाहतूक पोलिसांची नव्या तंत्रांच्या आधारे खाजगी आणि व्यावसायिक वाहनचालकांवर नजर असेल. नोंदणी बुक, विमा, परवाना, पीयूसी आदींसंबंधी कागदपत्रे जवळ बाळगण्याची गरज नसली, तरी त्याची सत्यप्रत वा सॉफ्ट कॉपी आपल्या मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवता येणार आहे.
 
 
दुसरीकडे पोलिसांनाही आपल्या दैनिक कारवाईची नोंद वाहतूक शाखेच्या पोर्टलवर करावी लागणार आहे. यात दंडाची रक्कम, कारवाई आणि त्याची कारणे आदींचा उल्लेख बंधनकारक आहे.