मेडिकलमधील एमआरआय बंदच

    दिनांक :17-Oct-2020
|
-नव्या एमआरआयचा पत्ताच नाही
-उपराजधानीचे आरोग्यच धोक्यात
-शासकीय यंत्रणा कोविडमध्ये मग्न
नागपूर, 
आशिया खंडात आकाराने सर्वात मोठे आणि मध्य भारतातील सर्वसामान्यांचे आधारस्तंभ असलेल्या नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील एमआरआय हे महत्त्वाचे उपकरण मागील चार महिन्यांपासून बंदच असून शासनाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
 
a _1  H x W: 0
 
मेडिकलमधील एमआरआय साधारण चार महिन्याभरापासून बंद पडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. अपघातात गंभीर जखमी qकवा डोक्यासह शरीरातील अंतर्गत सखोल तपासणीसाठी एमआरआय उपकरणाद्वारे अचुक तपासणी केली जाते. अतिशय बारिक-सारिक अचूक निदान होत असल्याने या तपासणी अहवालावरून उपचाराची पुढील दिशा ठरवता येते. आधुनिक वैद्यकशास्त्रात एमआरआय तपासणी महत्त्वाची मानली जाते. विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात एमआरआय तपासणी उपलब्ध होती. काही महिन्यांपूर्वीच मेयो रुग्णालयात नव्याने एमआयआर उपकरण सुरू झाले आहे..
 
मेडिकल रुग्णालयातील एमआरआय उपकरण सुमारे दहा वर्षांंपूर्वी कार्यान्वित झाले. मात्र, तपासणीचा भार वाढला त्याची गती संथावली आणि अखेर ते बंद पडले. वार्डात उपचारासाठी दाखल अतिगंभीर रुग्ण असो वा बाह्यरुग्ण विभागातील आलेले रुग्ण, या सर्वांना मेयो रुग्णालय अथवा खाजगी केंद्रात एमआरआयसाठी पाठविले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दगदग, मनःस्ताप तसेच आर्थिक झळ पोहोचत आहे.
 
उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर शहराची ही स्थिती आहे. सध्याचे बंद पडलेले एमआरआय उपकरणाची क्षमता संपलेले असून ते कालबाह्य झाले असल्याचे समजते. बंद उपकरणाची तातडीने दुरुस्त व्हावी, यासाठी मेडिकल प्रशासनाने निरंतर पाठपुरावा चालविला आहे. आरोग्य व इतर सर्वच शासकीय यंत्रणा सध्या कोविडमध्ये दंग आहे. त्यामुळे इतर बाबींकडे यंत्रणेचे लक्षच नसल्याचे लपून राहिलेले नाही.
नवे एमआरआय अडले कुठे?
गरजू रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्णांची होणारी आबाळ, वाढती संख्या आणि भविष्याचा विचार करता अतिविशेषोपचार रुग्णालय व टड्ढामा सेंटरमध्येही अद्यावत प्रगत एमआरआय उपकरण खरेदीचा प्रस्ताव दोन वर्षाांपूर्वीच पाठवला गेला. त्यासाठी १२ कोटी रुपये निधी मंजूर होऊन उपकरण खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकिन महामंडळाकडे ते हस्तांतरित करण्यात आले. मात्र, अद्यापही उपकरण खरेदीची प्रक्रिया पुढे सरकलेलीच नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
निरंतर प्रयत्न- डॉ. गावंडे
मेडिकल रुग्णालयातील एमआरआय उपकरणासाठी हाफकिन महामंडळ व शासनाकडे निरंतर पाठपुरावा केला जात असल्याचे मेडिकल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.
'प्रश्न कायमच
पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या उपराजधानीच्या नागपूर शहरातील ही अवस्था पाहता शासनाचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. महाविकासाचा गाजावाजा करीत नवे सरकार सत्तेवर आले खरे. पण, उपराजधानीच्या शहरातील आरोग्य व्यवस्था कितपत बळकट होईल, असा प्रश्न जनतेला पडला आहे'