दहशतवाद्यांचे बंकर्स उद्ध्वस्त, एकाला जिवंत पकडले

    दिनांक :17-Oct-2020
|
श्रीनगर,
काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या बिमोडासाठी सुरक्षा दलांनी धडक मोहीम सुरू केली आहे. आज केलेल्या मोठ्या कारवाईत लष्करए-तोयबाची लपण्याची ठिकाणे अर्थात् बंकर्स उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले आहे. सूत्रांनुसार, 55 राष्ट्रीय रायफल्स आणि 185 केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बटालियनने अवंतीपुरा पोलिसांच्या सहकार्याने शुक‘वारी केलेल्या संयुक्त कारवाईत लष्करए-तोयबाच्या दहशतवाद्यांचे बंकर्स हुडकून काढले. तसेच, ते उद्ध्वस्तही केले.
 
 
 

asd_1  H x W: 0
यावेळी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले असून, स्फोटके, गोळाबारूद , एके-47 रायफलच्या 2091 राऊंड गोळ्या असा शस्त्रसाठा जप्त केला. अटकेतील दहशतवाद्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, विस्तारवादी चीनच्या सीमा भागात कुरापती सुरूच असतानाच आता पाकिस्तानातून 250 दहशतवादी सीमा ओलांडून घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे भारतीय जवानांकडून डोळ्यांत तेल घालून गस्त घातली जात असल्याचे वरिष्ठांनी सांगितले. याशिवाय काश्मीर खोर्‍यातील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय जवानाच्या एका पथकावर गोळीबार केला. यावेळी जवानांनीही प्रत्युत्तर दिले. या भागाला घेराव करत शोधमोहीम सुरू असल्याचे समजते.