दारव्हा तालुक्यात देवी दुर्गेचे आगमन

    दिनांक :17-Oct-2020
|
दारव्हा, 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अतिशय जल्लोष व उत्साहात साजरा होणार्‍या नवरात्रोत्सवाला या वर्षी अतिशय साध्या पद्धतीने सुरुवात झाली. घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासूनच सार्वजनिक मंडळांच्या निवडक कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर, टेम्पोने मूर्तीकारांकडून माता दुर्गेच्या मूर्ती आणून, अंबे माता की जय, जय माता दी असा जयजयकार करत त्यांची अतिशय साध्या पद्धतीने पण उत्साहात स्थापना केली.
 
 
y17Oct Durga_1  
 
यावर्षी सर्वच सण उत्सव यावर निर्बंध असल्याकारणाने सर्व सार्वजनिक मंडळांनी सुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीदेखील केल्याचे सांगितले. निर्बंध असूनही आदिशक्तीच्या या उत्सवासाठी कार्यकर्ते व नागरिकांचा उत्साह कायम असल्याचे चित्र आहे.