घरकुल हप्त्यासाठी भाजपाचे साखळी उपोषण

    दिनांक :17-Oct-2020
|
- मारेगाव नगर पंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष
मारेगाव, 
गुरुवार, 15 आक्टोबरपासून मारेगाव नगर पंचायतसमोर घरकुलांचे हप्ते ताबडतोब मिळावे याकरिता भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, सरचिटणीस प्रशांत नांदे, मारोती दवाळकर, दत्तू लाडसे, वसंत खंगार काही कार्यकर्त्यांसह साखळी उपोषणाला बसले आहेत.
 

y16Oct B J P_1   
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रत्येकाला घर’ या सदराखाली अनेकांना घरकुलांचे वाटप केले. लाभधारकांनी घरकुलांचे बांधकाम सुरू केले. परंतु पाच वर्षे लोटूनही त्यांची घरे पूर्णत्वास गेली नाहीत. याला कारण म्हणजे स्थानिक प्रशासन आहे. घरकुलाचे केंद्र सरकारकडून चार महिन्यांपासून पैसे आले असताना स्थानिक पातळीवर असलेल्या त्रुटी दूर करण्याऐवजी लाभधारकांना केंद्र सरकारने पैसे पाठविले नाही असे सांगून वेळ निभावून नेली जाते.
 
 
शुक‘वार, 16 आक्टोबरला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून थेट म्हाडा अधिकार्‍यांना विचारणा केली असता त्यांनी घरकुलांचे पैसे चार महिन्यांपासून आले आहेत, परंतु स्थानिक नगर पंचायत त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने पैसे मिळत नाहीत. हे आंदोलन पैसे मिळाल्यावरच थांबेल, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.