डुकरांमधील कोरोना विषाणू फैलावण्याची भीती

    दिनांक :17-Oct-2020
|
वॉशिंग्टन, 
कोरोनाच्या एकाच ‘स्ट्रेन’पासून जगाची सुटका होत नसताना आता पुन्हा एकदा विषाणू फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. डुकरांमध्ये असलेला कोरोना विषाणू फैलावण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या कोरोनाची बाधा डुकरांपासून माणसांनाही होत असल्यामुळे अधिक धोका निर्माण झाला आहे.
 
 
fear _1  H x W:
 
संशोधनानुसार, कोरोना विषाणूच्या या स्ट्रेनला स्वाईन अ‍ॅक्युट डायरिया सिंड्रोम कोरोना (एसएडीएस-सीओवी) म्हणून ओळखले जाते. हा कोरोनाचा विषाणू वटवाघळांमधून आला आणि त्याची माहिती 2016 मध्ये समोर आली होती. चीनमधील अनेक डुकरांना याची बाधा झाली होती.
 
 
या संशोधनात अमेरिकेतील चॅपल येथील नॉर्थ कॅरिलोना विद्यापीठाच्या संशोधकांनी या संशोधनात सहभाग घेतला होता. या संशोधनानुसार, हा विषाणू मानवाचे फुफ्फुस आणि आतड्यांच्या पेशीत वाढू शकतो. हा विषाणू बिटाकोरोना विषाणू एसएआरएस-सीओवी-2 चा भाग आहे. यामुळे मानवाला श्वसनसंबंधी कोरोनाची बाधा होऊ शकते. एसएडीएस-सीओवी हा एक अल्फाकोरोना विषाणू आहे, जो डुकरांच्या पोटात आणि आतड्यांमध्ये आजाराचे कारण ठरतो. या विषाणूमुळे जुलाब आणि उलट्या होतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. पीएनएएस जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसाार, शास्त्रज्ञांनी एसएडीएस-सीओवीच्या संभाव्य धोक्याचे आकलन करण्यासाठी प्रयोगशाळेत परीक्षण केले होते. त्यानंतर हा विषाणू मनुष्याचे यकृत आणि आतड्यांच्या पेशींमध्ये वेगाने वाढू शकतो, असे लक्षात आले. डुकरांचे मांस खाणार्‍या देशांमध्ये हा संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचे सांगितले जात आहे.