मेजर रमेश उपाध्याय यांचा जदयूत प्रवेश

    दिनांक :17-Oct-2020
|
पाटणा, 
मालेगाव बॉम्बस्फोटातील एक आरोपी सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी नितीशकुमार यांच्या जदयू पक्षात प्रवेश केला आहे. जदयूत त्यांच्यावर उत्तरप्रदेशच्या माजी सैनिक विभागाचे राज्य संयोजक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तरप्रदेशचे जदयू प्रमुख अनुपसिंह पटेल यांनी नुकतेच त्यांचे नियुक्तीपत्र जाहीर केले.
 

major ramesh upadhyays en 
 
मालेगाव बॉम्बस्फोटात कथित सहभागाबद्दल महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनाही अटक केली होती. त्यानंतर 2017 मध्ये त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या एका विशेष एनआयए न्यायालयात त्यांची सुनावणी सुरू आहे.
 
 
उपाध्याय पुण्याचे रहिवासी आहेत. मात्र, त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील बलिया येथे झाला. याच ठिकाणाहून त्यांनी अपक्ष म्हणून 2019 ची लोकसभा निवडणूकही लढवली होती. यापूर्वी त्यांनी 2012 मध्ये हिंदू महासभेच्या तिकिटावर बलिया जिल्ह्यातील बैरिया येथून उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक लढवली होती.