मंत्री यशोमती ठाकूर यांना बडतर्फ करावे

    दिनांक :17-Oct-2020
|
- यवतमाळ शहर भाजपाची मागणी
यवतमाळ, 
वाहतूक पोलिस कर्मचार्‍यास मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, त्यांचे चालक व दोन कार्यकर्त्यांना अमरावतीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020 रोजी तीन महिने कारावास व प्रत्येकी 15 हजार 500 रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
 
 
y16Oct B J P_1  
 
त्यामुळे पोलिसांना मारहाण करणार्‍या तत्कालीन आमदार आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी समजून आपल्या आमदारकी व मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, तो न दिल्यास मु‘यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, असे निवेदन भारतीय जनता पार्टी यवतमाळ शहरतर्फे देण्यात आले.
 
 
हा निर्णय देणार्‍या न्यायालयाचे अभिनंदन असून त्यांनी यापुढेही राजकीय दबावाला बळी न पडता पुढील न्यायालयीन प्रकि‘या पार पाडावी व दोषींची शिक्षा कायम ठेवावी. जर यशोमती ठाकूर यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही किंवा मु‘यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केले नाही तर भाजपातर्फे तीव‘ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा पदाधिकार्‍यांनी या निवेदनातून दिला आहे.
 
 
जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, रवी बेलुरकर, अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, दत्ता राहणे यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत यादव, राजू पडगिलवार, जिल्हा महामंत्री रवी बेलुरकर, प्रदेश महिला कार्यकारणी सदस्य रेखा कोठेकर, शहर उपाध्यक्ष शंतनू शेटे, शहर सरचिटणीस डॉ. अमोल देशमुख, हेमंत दायमा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश धुरट इत्यादी उपस्थित होते.