नवा कृषी कायदा शेतकरी हिताचा

    दिनांक :17-Oct-2020
|
- आ. डॉ. अशोक उईके यांचे प्रतिपादन
राळेगाव, 
भारतीय जनता पार्टी राळेगाव तालुक्याच्या वतीने किसान संवाद सभा शुक‘वार, 16 ऑक्टोबर रोजी वाढोणाबाजार येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी विस्तृतपणे नवीन कृषीविषयक धोरण शेतकरी हिताचे असल्याचे प्रतिपादन केले.
 
 
y17Oct Krushi_1 &nbs
 
ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 वर्षांपासूनचे जाचक कृषी कायदे मोडीत काढत शेतकरी हिताच्या तीन कृषी विधेयकांना पारित करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार नवीन कृषी धोरण विकसित करण्यासाठी कायदे तयार केले. कृषी उत्पन्न बाजार समितीची एकाधिकारशाही संपुष्टात आणून स्पर्धात्मक धोरण स्वीकारले. शेतकर्‍यांना आपला कृषीमाल देशात व देशाबाहेर विकण्याचा हक्क मिळवून दिला. आता जिथे जास्त भाव मिळेल तिथे शेतकरी आपला शेतीमाल विकू शकतो.
 
 
शेतकरी आपल्या कष्टाने शेती माल पिकवतो, पण भाव व्यापारी व दलालांच्या मनाप्रमाने मिळत होता. त्यामधून कायम मुक्तता मिळाली आहे. व्यापार्‍यांनी शेतीमाल खरेदी केला तर त्याच दिवशी नगदी किंवा तीन दिवसांत शेतकर्‍यांना पैसे देण्याचे बंधन घातले आहे. सोबतच केंद्र सरकार शेतमालाची खरेदी हमी भावानेच करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारला शेतकरी हिताचे निर्णय मान्य नसून त्यांनी सुधारित कृषी कायद्याबाबत अपप्रचार सुरू केला आहे. शेतकर्‍यांमध्ये शंका उत्पन्न करीत आहे. विविध मार्गाने काँग‘ेसी सवयीप्रमाणे भोळ्या, प्रामाणिक, नम‘ शेतकरी बांधवांत संभ‘म निर्माण करण्याचा सुनियोजित प्रयत्न करीत असल्याचे आ. डॉ. उईके यांनी सांगितले.
 
 
पण देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांप्रती जागृत असून शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना न करता शेतकर्‍यांचा नफा दुप्पट होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शेतकरी बंधूंनी अपप्रचाराला बळी न पडता महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहन केले.
 
 
किसान संवाद सभा निमित्ताने शेतकरी बांधवांची जीवनवाहिनी बैलजोडी तसेच शेतीला पूरक व उपयुक्त साधन असलेल्या ट्रॅक्टरचे राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी विधीवत पूजा करून ॠण व्यक्त केले. यावेळी चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर, भालचंद्र कविश्वर, बाळासाहेब दिघडे, विद्या लाड, विनोद मांडवकर, विशाल पंढरपुरे, दिनेश गोहने, वसंत उपाते, लोचन धोबे, रणजित ठाकरे, शारदानंद जयस्वाल, दशरथ मोहुर्ले, डॉ. मांडेकर, किशोर गारघाटे, प्रशांत खंडाळकर, सुदर्शन खंडाळकर इत्यादी भाजपा कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या सं‘येने उपस्थित होते.