रात्रीस खेळ चाले पुन्हा चर्चेत!

    दिनांक :17-Oct-2020
|
मुंबई,
रात्रीस खेळ चाले या मालिकेत चांगली लोकप्रियता मिळवली. सगळीकडे कुटुंब वत्सल... सून-सासू नाट्य रंगलं असताना रात्रीस खेळ चाले या मालिकेनं जरा वेगळी वाट धरली. तिथेही सासू-सून हे नाट्य होतं. पण त्या पलिकडे अनेक गोष्टी या मालिकेत घडत होत्या. यात थरार होता. यात मालवणी भाषेचा गोडवा होता.भूताचा वावर मुळे ही मालिका वेगळी ठरली. पहिले दोन्ही सीझन लोकांना आवडले. पण आता आणखी एका सीझनची चर्चा ऑनलाईन विश्वात जोरावर आहे. ती चर्चा आहे छोट्या शेवंता, माई आणि आण्णा नाईकांची.
 
 
k_1  H x W: 0 x
 
 
ही गंमत आहे एका डिजिटल अॅपची. यात चेहऱ्यात बदल करून आण्णा नाईक, शेवंता, माई यांच्या त्याच वेशभूषेतले लहानपणीचे फोटो तयार करण्यात आले आहेत. ते सध्या फोटो बरेच व्हायरल होत आहेत. रात्रीस खेळ चालेच्या कलाकारांपर्यंत हे फोटो पोहोचले आहेत. त्या सर्वांनी ही गंमत खूपच एन्जॉय केली आहे. त्यातल्या एका फोटोत आण्णा नाईक, शेवंत आणि माई असे तिघे उभे दिसतात. त्यात त्यांची वेशभूषाही मालिकेत असते तशी आहे. आण्णांनीही हाती बंदूक धरली आहे. तर शेवंता आणि माईने नेहमीप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसं एक्स्प्रेशन दिलं आहे. तर दुसरा फोटो आहे तो आण्णा आणि शेवंताचा आहे.