बरांज कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांना अटक व सुटका

    दिनांक :29-Oct-2020
Total Views |
-आंदोलकांना अटक करताना पोलिस प्रशासन
भद्रावती, 
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बरांज कोळसा खाणातील प्रकल्पग्रस्त व कामगारांनी पदयात्रा काढली. बरांज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा निघणार होती. पण, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून आंदोलनकर्त्यांना ताडाळी येथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची सुटका केली गेली.

d_1  H x W: 0 x 
 
 
बरांज कोळसा खाणीचे काम सुरू करण्याआधी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावाव्यात, यासाठी याआधीही प्रकल्पग्रस्तांना लोकप्रतिनिधी, खाण प्रबंधक, तालुका प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिले. पण, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटल्या नाही. त्यामुळे अखेर प्रकल्पग्रस्तांनी पदयात्रा काढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बरांज येथून प्रकल्पग्रस्तांनी पदयात्रेला प्रारंभ केला. जिल्हाधिकारी कार्यालय गाठून ते आपले गर्‍हाणे मांडणार होते. पण, कोरोना काळात जमावबंदी आदेश लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांना पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी आम्हाला कारागृहात टाका, आम्ही अन्नत्याग करू, अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचविण्यात आले. जिल्हाधिकारी यांना त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. नंतर त्यांना भद्रावतीपर्यंत सोडण्यात आले. प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी, खाण बंद झाल्यापासून थकित वेतन द्यावे, कामगारांचा भविष्य निर्वाह निधी द्यावा, बरांज मोकासा व चेकबरांज गावाचे पुनर्वसन करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात आले.