झलक आणि मंथन पुस्तकांचे प्रकाशन

06 Oct 2020 15:33:09
अर्चना देव यांच्या झलक व रघुनंदन देशपांडे यांच्या मंथनचे प्रकाशन संपन्न
बुलडाणा 
येथील सौ अर्चना देव यांच्या झलक आणि रघुनंदन देशपांडे यांच्या मंथन या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्रातील नामवंत इतिहासकार जगदिशचंद्र पाटील यांचे हस्ते एका छोटेखानी समारंभात संपन्न झाले.अर्चना देव यांच्या झलक या पुस्तकात धार्मिक, सामाजिक, ललित व वैचारिक लेखांचा समावेश आहे.

prakashan_1  H  
 
अर्चना देव यांचे या आधी वादळवाट हे पुस्तक प्रकाशित झाले आहे"तरुण मुलींना मार्गदर्शन आणि समुपदेशन करणारे वादळ वाट पुस्तक आहे ,त्याला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे तसेच अर्चना देव यांची मनस्विनी"ही ऐतिहासिक कादंबरी नावाजलेली संस्था "कॉन्टिनेटल प्रकाशन पुणे"लवकरच प्रकाशित करणार आहे. . रघुनंदन देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तकात वैचारिक व व्यक्ती विषेश लेखांचा समावेश आहे.यात स्वामी विवेकानंद ,आईनस्टाइन यासारख्या विविध असामान्या व्यक्तींच्या जीवनावरील लेख आहेत.गणिताचे अभ्यासक असलेल्या रघुनंदन देशपांडे यांचे गणिताच्या सोप्य़ा पध्दती हे पुस्तक आधी प्रकाशित झाले आहे जे विद्यार्थी वर्गाला गणितासाठी बहुपयोगी आहे.
 
"झलक" चे प्रकाशन करतांना जगदिशचंद्र पाटील म्हणाले की, कोणत्याही अनुभवाला व त्याही पलिकडच्या मानवी जीवनाला तेवढ्याच सामर्थ्यानिशी पकडुन जीवनानुभवाचं संवेदनशील निरिक्षण करणार्‍या अर्चना देव यांचे लेख पारदर्शी व समंजस आहे.तर रघुनंदन देशपांडे यांचे मंथन म्हणजे प्रतिभासंपन्न मनांच्या सुप्त पातळीवरून प्रकट झालेले विचार आहेत. यातील लेख मानवी मनाला मंथन करायला आवणारे आहेत. वाचक या दोन्ही पुस्तकांचे निश्चित स्वागत करतील असे वाटते.
 
अकोल्याच्या सौ चित्रा श्रीकांत देशपांडे यांच्या रेणुका ग्रंथ वितरण या प्रकाशनाने हो दोन्ही पुस्तके प्रकाशित केली असुन प्रसिध्द लेखक सुरेश पाचकवडे यांची या दोन्ही पुस्तकांना प्रस्तावना आहे.तर डॉ विनय दांदळे या मनोगत दोन्ही पुस्तकांना लाभले आहे.याप्रसंगी अर्चना देव व रघुनंदन देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अगदी मोजके व जाणकार वाचक रसिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0