मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा आयपीएल चषक

    दिनांक :11-Nov-2020
|
- दिल्ली कॅपिटल्सवर ५ गड्यांनी मात
- पंजाबच्या लोकेश राहुलला ‘ऑरेंज कॅप
a_1  H x W: 0 x
- दिल्लीच्या कॅगिसो रबाडाला ‘पर्पल कॅप
दुबई, 
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ५ गड्यांनी मात करून सलग दुसèयांदा आणि इतिहासात पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग चषकाला गवसणी घातली. प्रथमच अंतिम फेरी गाठणाèया दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या तेराव्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाèया qकग्ज इलेव्हन पंजाबच्या लोकेश राहुलला ‘ऑरेंज कॅपचा, तर सर्वाधिक बळी टिपणाèया दिल्लीच्या कॅगिसो रबाडाला ‘पर्पल कॅपङ्कचा मान प्रदान करण्यात आला.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात प्रारंभीच तीन जबरदस्त हादरे बसल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने जोरदार मुसंडी मारत मर्यादित षटकात ७ बाद १५६ धावा उभारल्या. प्रत्युत्तर देताना कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशनने झुंज देत १८.४ षटकात ५ बाद १५७ धावा ठोकून आपल्या मुंबई इंडियन्स संघाला विजयश्री मिळवून दिली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर व ऋषभ पंतची अर्धशतकी खेळी संघाला आयपीएल qजकून देण्यास पुरेशी ठरली नाही. ट्रेंट बोल्टने प्रभावी मारा करून मुंबईसाठी विजयाचा मार्ग सोपा केला.
 
विजयसाठी धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डिकॉकने ४५ धावांची सलामी भागीदारी करीत चांगली सुरुवात केली. मार्कस स्टोइनिसच्या गोलंदाजीत डिकॉक पंतकडून झेलबाद झाला. पंतने १२ चेंडूत ३ चौका, १ षट्कारसह २० धावा काढल्या. पुढे रोहित व सूर्यकुमार यादवने दिल्लीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत ४५ धावांची भागीदारी केली. एक चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार बाद झाला. त्यावेळी मुंबईची स्थिती १०.५ षटकात २ बाद ९० अशी होती. पुढे रोहितला ईशान किशनची साथ मिळाली. रोहितने १२ व्या षटकात कॅगिसो रबाडाच्या सलग दोन चौकार ठोकीत आपले अर्धशतक साजरे केले. या दोघांनी नाबाद खेळी करीत १५ षटकात २ बाद १२६ धावांचा टप्पा गाठून दिला. विजयासाठी उर्वरित २२ चेंडूत २० धावा काढण्याची गरज असताना रोहित अ‍ॅनरिच नॉर्टिजच्या गोलंदाजीला बळी पडला.
 
रोहितने ५१ चेंडूत ५ चौकार व ४ षट्कारांसह ६८ धावांची दिमाखदार खेळी केली.
पुढे ईशान व कायरन पोलार्ड संघाला लक्ष्य गाठून देईल असे वाटत होते. परंतु १७ चेंडूत १० धावांची आवश्यकता असताना पोलार्ड रबाडाच्या चेंडूवर बाद झाला. पुढे ईशान व हार्दिक पांड्याला १० चेंडूत केवळ १ धाव काढायची असताना हार्दिक नॉर्टिजच्या गोलंदाजीला बळी पडला. मात्र पुढे ईशान किशनला साथ देण्यास आलेल्या कृणाल पांड्याने एक धाव काढत मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ईशान किशनने १९चेंडूत ३ चौकार व एका षट्कारांसह नाबाद ३३ धावांची उपयुक्त खेळी केली.
 
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफक qजकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच्या सवंगड्यांना अपेक्षेनुसार धडाकेबाज सुरुवात करण्यात अपयश आले. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट व फिरकीपटू जयंत यादवच्या अचूक माèयामुळे दिल्लीने अवघ्या ३.३ षटकात २२ धावात ३ महत्त्वपूर्ण मोहरे गमावले आणि संघ दडपणाखाली आला. अगदी पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने सलामी फलंदाज मार्कस स्टोइनिसला बाद केले. दिल्लीच्या जेमतेम १६ धावा झाल्या असताना बोल्टने आणखी एक धक्का दिला. त्याने अqजक्य रहाणेलाही यिष्टमागे डिकॉकडे झेल सोपविण्यास भाग पाडले. त्यानंतर जयंत यादवने शिखर धवनचा त्रिफळा उडविला. भरवशाचा खेळाडू धवनने १३ चेंडूत ३ चौकारांसह १५ धावा काढल्या.
त्यानंतर मात्र कर्णधार श्रेयस अय्यर व ऋषभ पंतने संघाची पडझड थांबविली व चौदाव्या षटकाच्या प्रारंभी ३ बाद १०० धावांचा टप्पा गाठून दिला. १५ व्या षटकादरम्यान पंतने अर्धशतक साजरे केले. नॅथन काऊल्टरच्या चेंडूवर सलग दोन चौकार ठोकल्यानंतर पंतने हार्दिक पांड्याकडे झेल सोपविला. पंतने ३८ चेंडूत ४ चौकार व २ षट्कारांसह ५६ धावांची खेळी केली व त्याचे या आयपीएल मोसमातील हे पहिले अर्धशतक ठरले. त्याने अय्यरसोबत चौथ्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी केली. त्यावेळी संघाची स्थिती ४ बाद ११८ धावा अशी होती. पुढे श्रेयस अय्यरने शिमरॉन हेटमायरच्या साथीने आपले अर्धशतक पूर्ण केले, मात्र हेटमायर फार वेळ टिकाव धरू शकला नाही. तो बोल्टच्या वेगवान माèयाला बळी पडला. श्रेयसने अक्षर पटेलच्या मदतीने संघाला दीडशे धावांच्या समीप आणले असतानाच पटेल नॅथन काऊल्टरच्या चेंडूवर झेलबाद झाला. नंतर श्रेयसने कॅगिसो रबाडाच्या सहकार्याने संघाला मर्यादित षटकात ७ बाद १५६ धावा रचून दिल्या आणि मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १५७ धावांचे आव्हान ठेवले. श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करीत ५० चेंडूत ४ चौकार व २ षट्कारांसह नाबाद ६५ धावांचे योगदान दिले. श्रेयसचे या आयपीएलमधील तिसरे अर्धशतक ठरले. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने ३ बळी, नॅथन काऊल्टरने २ बळी, तर जयंत यादवने एक बळी टिपला. जसप्रीत बुमराहला मात्र एकही बळी टिपता आला नाही.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : २० षटकात ७ बाद १५६.
- मार्कस स्टोइनिस झे. डिकॉक गो. बोल्ट ००, शिखर धवन त्रि.गो. जयंत यादव १५, अqजक्य रहाणे झे. डिकॉक गो. बोल्ट ०२, श्रेयस अय्यर नाबाद ६५, ऋषभ पंत झे. हार्दिक पांड्या गो. नॅथन काऊल्टर ५६, शिमरॉन हेटमायर झे. नॅथन काऊल्टर गो. ट्रेंट बोल्ट ०५, अक्षर पटेल झे. बदली खेळाडू (एएस राय) गो. नॅथन काऊल्टर ०९, कॅगिसो रबाडा धावबाद (सूर्यकुमार यादव-काऊल्टर) ००, अवांतर ०४.
गडी बाद क्रम : १-०, २-१६, ३-२२, ४-११८, ५-१३७, ६-१४९, ७-१५६.
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट ४-०-३०-३, जसप्रीत बुमराह ४-०-२८-०, जयंत यादव ४-०-२५-१, नॅथन काऊल्टर ४-०-२९-२, कृणाल पांड्या ३-०-३०-०, कायरन पोलार्ड १-०-१३-०.
मुंबई इंडियन्स : १८.४ षटकात ५ बाद १५७.
- रोहित शर्मा झे. बदली खेळाडू (ललित यादव) गो. नॉर्टिज ६८,
क्विंटन डिकॉक झे. पंत गो. स्टोइनिस २०, सूर्यकुमार यादव धावबाद (दुबे-पंत) १९, ईशान किशन नाबाद ३३,
कायरन पोलार्ड त्रि.गो. रबाडा ०९, हार्दिक पांड्या झे. रहाणे गो. नॉर्टिज ०३, कृणाल पांड्या नाबाद ०१, अवांतर ०४.
गडी बाद क्रम : १-४५, २-९०, ३-१३७, ४-१४७, ५-१५६.
गोलंदाजी : आर. अश्विन ४-०-२८-०, कॅगिसो रबाडा ३-०-३२-१, अ‍ॅनरिच नॉर्टिज२.४-०-२५-२, मार्कस स्टोइनिस २-०-२३-१, अक्षर पटेल ४-०-१६-०, प्रवीण दुबे ३-०--२९-०.
---
--- बॉक्स --
रोहितचे २०० सामने पूर्ण
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये २०० सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. आज दिल्लीविरुद्धच्या अंतिम सामन्यात मैदानावर पाय ठेवताच त्याने हा मान मिळविला. दोनशेवा सामना खेळताना रोहितने आपल्या संघाला इतिहासात पाचव्यांदा आयपीएल चषक qजकून दिला. चेन्नई नंतर सलग दुसèयांदा आयपीएल चषक उंचावणारा मुंबई दुसरा संघ ठरला.
गत महिन्यात चेन्नई सुपर qकग्जचा कर्णधार महेंद्रqसह धोनी आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने २०१०, २०११ व २०१८ साली असे तीनवेळा आयपीएल विजेतेपद पटकावले.