ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजपातील राजकीय उपयुक्तता सिध्द

    दिनांक :12-Nov-2020
|
- मध्यप्रदेश पोटनिवडणूक निकाल
- श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली,
मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतील 19 जागा जिंकत भाजपाने राज्यात इतिहास घडवला आहे. या विजयाचे खरे शिल्पकार काँग‘ेसमधून नुकतेच भाजपात आलेले ज्योतिरादित्य शिंदे आहेत . या निकालांनी ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपातील आपली राजकीय उपयुक्तता सिध्द केली.

job_1  H x W: 0 
 
भाजपासाठी आपण लायबिलिटी नाही, तर अ‍ॅसेट असल्याचे पोटनिवडणुकीतील निकालांनी शिंदे यांनी दाखवून दिले. यामुळे शिंदे यांचा लवकरच होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातील समावेश निश्चित झाला आहे. शिंदे यांच्यामुळे आणखी एक राज्य भाजपाच्या ताब्यात आले. त्यामुळे त्याचे योग्य ते बक्षिस शिंदे यांना मिळालेच पाहिजे, तसेही शिंदे यांची राजकीय उपयुक्तता लक्षात घेऊन भाजपाने त्यांना आधीच राज्यसभेवर पाठवले आहे.
 
सामान्यपणे कोणत्याही पोटनिवडणुकीचा सरकारच्या स्थैर्यावर फारसा परिणाम होत नसतो. मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निकालांनी मात्र राज्यातील शिवराजसिंह चौहान सरकारने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग‘ेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत काँग‘ेसचे 25 आमदारही राजीनामा देत भाजपात आले होते.तीन आमदारांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. अशा प्रकारे 28 मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या.
 
काँग‘ेसच्या 25 आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे राज्यातील कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. शिवराजसिंह चौहान मु‘यमंत्री झाले. पण सरकार पूर्ण बहुमतात नव्हते. त्यामुळे सरकारच्या स्थैर्यासाठी भाजपाला या पोटनिवडणुकीतील जास्तीत जास्त जागा जिंकणे आवश्यक होते. 230 सदस्यांच्या मध्यप्रदेश विधानसभेत एक जागा रिक्त आहे. म्हणजे 229 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाला बहुमतांसाठी 115 जागांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात भाजपाजवळ 107 आमदार आहेत. म्हणजे भाजपाला बहुमतासाठी 8 जागा कमी पडत होत्या. पोटनिवडणुकीतील 28 पैकी 19 जागा जिंकल्यामुळे भाजपाचे विधानसभेतील सं‘याबळ 126 वर गेले आहे. काँग‘ेसजवळ 87 आमदार होते, 9 जागा जिंकल्यामुळे काँग‘ेसचे सं‘याबळ 96 झाले आहे.म्हणजे भाजपाजवळ काँग‘ेसपेक्षा 30 आमदार जास्त आहेत. त्यामुळे शिवराजसिंह सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, याबाबत आता कोणतीच शंका उरली नाही.
 
एखादवेळ कोणत्याही कारणांनी पोटनिवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसते, आणि सरकार पूर्ण बहुमतात येऊ शकले नसते, तर शिंदे यांच्या भाजपातील राजकीय उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. त्याची राजकीय किंमतही त्यांना चुकवावी लागली असती. त्यामुळेच या पोटनिवडणुकीत मु‘यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यापेक्षाही ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आपल्यासोबत आमदारकीचा राजीनामा देत भाजपात आलेल्या आपल्या समर्थकांना पुन्हा निवडून आणणे, हा शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला होता. यात त्यांनी बाजी मारली आहे. मात्र 9 जागा काँग‘ेसने जिंकल्या आहेत. याचाच अर्थ भाजपाचे 9 आमदार पराभूत झाले. मात्र त्यामुळे भाजपाने जिंकलेल्या 19 जागांचे महत्व कमी होत नाही. पोटनिवडणुकीच्या निकालांनी भाजपामधील ज्योतिरादित्य शिंदे यांचे राजकीय भविष्य वाढले आहे. शिवराजसिंह सरकार पूर्ण बहुमतात आले, याचे श्रेय शिंदे पूर्णपणे यांनाच द्यायला पाहिजे.