लक्ष्मीपूजन दिनी 60 गोवंशाला जीवदान

    दिनांक :15-Nov-2020
Total Views |
-पांढरकवडा पोलिसांकडून 22 लाखांचा मुद्देेमाल जप्त
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावरील गो तस्करी थांबायचे नाव घेत नसून हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या दिवशीच पाटणबोरी चौकीचे सपोनि भरत चापाईतकर यांनी मिळालेल्या माहितीवरून आरटीओ तपासणी नाका पिंपळखुटी येथे नाका कर्मचार्‍यांच्या मदतीने सापळा रचून कंटेनर क‘मांक एचआर55-1642 थांबविला व कंटेनरची पाहणी केली.
 
s_1  H x W: 0 x
 
या कंटेनरची लाकडी पाट्यांनी दोन भागात विभागणी करून दोन्ही कप्प्यांत गोवंश दाटीवाटीने भरून त्यास आखूुड दोरीने पक्के बांधून असल्याने त्यांना हालचालसुद्धा करता येत नव्हती. या सर्व गोवंशास मागील खूप दिवसांपासून चारा, पाणीसुद्धा दिले नव्हते त्यामुळे सर्व गोवंश मरणासन्न आणि अतिशय वेदनादायक स्थितीत आढळून आले.
 
यात गोवंशीय बैल जातीची एकूण 60 जनावरे, अंदाजे किंमत 9 लक्ष रुपयांची होती. यातील 3 गोवंश वेदनादायक स्थितीत मृत आढळली. पोलिसांनी वाहन 13 लक्ष आणि चार मोबाईल 5800 रुपये आणि नगदी 1800 रुपये असे एकूण 22,07,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
मोहम्मद जाकीर मोहम्मद जहीर (वय 45), क्लीनर मुस्तकीम कल्लूखां (वय 23), आरिफखां फुरसतखां (वय 30), जाबेरखां रऊफखां (वय 20) सर्व रा. मध्यप्रदेश यांना अटक करून सर्वांविरुद्ध पांढरकवडा पोलिस ठाणे येथे प्राण्यांना क‘ूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम महाराष्ट्र प्राणीरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 अन्वये गुन्हा नोंद केला.
 
 
दीपावलीच्या दिवशी गोवंशांना जीवनदान दिल्याने पोलिसांचे स्थानिक नागरिकांनी अभिनंदन केले. ही कारवाई पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील व ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सपोनि चापाईतकर, पोहेकॉ सुशील शर्मा, नापोकॉ साहेबराव बेले, अफजलखां पठाण, उमेश कुमरे, राजू बेलयवार यांनी पार पाडली.
 
 
मध्यप्रदेशपासून पांढरकवडापर्यंत अनेक पोलिस ठाणे येत असून या सर्व ठिकाणी या वाहनांची कसलीही चौकशी का होत नाही असा प्रश्न गोप्रेमींना पडला आहे. या गो तस्करीला आर्थिक पाठबळावर मदत देऊन या गाड्या सीमेपर्यंत सोडल्या तर जात नाही, असा गंभीर प्रश्न उभा झाला आहे. या कामी पांढरकवडा आणि बोरी या गावातील काही व्यक्ती नेहमी मदत करीत असून त्यांना गोतस्करांना सीमेपार करण्यासाठी मोठी रक्कम मिळत असल्याने यांची हिंमत प्रचंड वाढली आहे. या सर्वांच्या मुसक्या आवळणे अत्यंत गरजेचे झाले आहे.