अक्षयला आठवले कॉलेजचे दिवस

    दिनांक :20-Nov-2020
|
मुंबई, 
जीवनाचा प्रवास खडतर असतो आणि मग त्यावेळी आपल्याला आपले कॉलेजची दिवस आठवल्यावाचून राहात नाहीत, जेव्हा आपल्यावर कोणत्याही जबाबदार्यांचे ओझे नसते, कोणत्याही डेडलाईन्स नसतात, न संपणार्‍या कामाचा बोजा नसतो. पुन्हा जर का आपल्याला ते स्वच्छंद दिवस जगायला मिळाले तर...
 

AKSHY_1  H x W: 
 
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियावाली मा मालिकेत आता एक रोचक वळण येणार आहे. एक व्यक्ती म्हणून रोहनमध्ये बदल घडताना आणि जीवनाला दिशा देण्यासाठी तो धडपड करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. रोहन आपल्या आईच्या इच्छेनुसार अखेरीस एमबीए करण्याचे ठरवतो. अशा वेळी रोहनचे पात्र साकारणार्या अक्षयला आपले कॉलेजचे दिवस आठवले नाहीत, तरच नवल. अक्षयला हे कथानक आजच्या काळाशी खूप सुसंगत वाटते, कारण ते तुम्हाला भूतकाळाच्या रम्य आठवणींत घेऊन जाते. रोहनला त्याचे कॉलेजचे दिवस- परीक्षा, तयारी आणि कारकीर्द घडवण्याचा उत्साह हे सारे काही आठवले.
 
 
याबद्दल अक्षय सांगतो, रोहनच्या माध्यमातून मला माझे कॉलेजचे दिवस जगायला मिळत आहेत. कथानकाचा हा भाग माझ्यासाठी विशेष आहे कारण या भागाने कॉलेजच्या काळातील माझ्या स्वच्छंद दिवसांच्या स्मृती जगावल्या. मला वाटते, अभिनेता असल्याचा हा एक मोठा फायदा आहे, की तुम्हाला अनेक आयुष्यं जागता येतात आणि तुम्ही साकारत असलेल्या अनेक व्यक्तिरेखांमधून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळते.
 
 
आगामी भागात प्रेक्षक रोहनला आयुष्याचे पान पालटताना आणि काकूला हवा तसा तिचा मुलगा बनताना बघतील. आपल्या चुका तो सुधारेल, आपल्या आईला अभिमान वाटावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करेल आणि एकंदरच आपल्या जीवनावरची आपली पकड मजबूत करेल.