डग्लस स्टुअर्टच्या ’शुगी बेन’ ला 2020चा बुकर पुरस्कार

    दिनांक :20-Nov-2020
|
लंडन, 
न्यूयॉर्कमधील स्कॉटिश लेखक डग्लस स्टुअर्ट यांना आत्मकथालेखनाच्या पदार्पणातच ’शुगी बेन’ या पुस्तकासाठी 50 हजार पौंड रुपयांचा प्रसिद्ध बुकर पुरस्कार मिळाला आहे. ग्लासगोच्या 1980च्या काळातील प्रेम आणि मद्यपान याचा संयोग असलेल्या वयातील या कथा आहेत. बर्न्ट शुगर ही कादंबरी लिहिणार्‍या भारतीय वंशाचा लेखिका अवनी दोशी यांना मागे टाकत डग्लस स्टुअर्ट यांनी हा पुरस्कार मिळविला.
 
 
dug_1  H x W: 0
 
44 वर्षीय स्टुअर्ट त्यांनी हे पुस्तक आपल्या आईला समर्पित केले आहे, जी स्टुअर्ट 16 वर्षाचे असताना अतिमद्यपानाने वारली होती. लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधून पदवी घेतल्यानंतर स्टुअर्ट फॅशन डिझाईनमध्ये करिअर सुरू करण्यासाठी न्यूयॉर्कला गेले. मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. शुगी हे एक कल्पित लिखाण आहे,परंतु पुस्तक लिहिणे माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी होते, असे स्टुअर्ट म्हणाले.
 
 
मला नेहमीच लेखक बनायचे होते त्यामुळे ही स्वप्नपूर्तीच आहे. या घटनेने माझे संपूर्ण आयुष्य बदलवून टाकले आहे, असे ते आपल्या भाषणात म्हणाले. स्टुअर्टने कॅल्व्हिन क्लीन, राल्फ लॉरेन आणि गॅपसह विविध ब्रँडसाठी काम केले आहे. दशकभरापूर्वी त्यांनी रिकाम्या वेळात लिखाण सुरू केले. दुबईतील भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोशी या बर्ट शुगर’ या त्यांच्या कादंबरीसाठी अंतिम सहा लेखकांमध्ये निवडल्या गेल्या होत्या. परंतु पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत त्या दुर्दैवाने हरल्या.