युट्युब, फेसबुकवर बंदी आणण्याचा रशियाचा विचार

    दिनांक :20-Nov-2020
|
मॉस्को, 
संसदेत गुरुवारी सादर केलेल्या कायद्याच्या मसुद्यानुसार रशिया युट्युब, फेसबुक आणि अमेरिकेतील अन्य समाज माध्यम मंचाला ‘ब्लॉक’ करू शकतो. रशियातील घटक राज्यांमधील प्रसार माध्यमांना वेसण घालण्यासाठी रशियन सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
 
 
putin_1  H x W:
 
विदेशी समाज माध्यमांकडून रशियन नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन झाले अथवा नाही हे तपासण्याचे सर्वाधिकार अभियोक्ता कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आले असल्याचे मसुद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. या विधेयकामुळे रशियाचा फेडरल मीडिया वॉचडॉग ‘रोस्कोमॅनाडझॉर’वर पूर्णपणे किंवा अंशत: नियंत्रण आणता येणे शक्य होणार आहे. कारण युट्यूब, फेसबुक व अन्य समाजमाध्यमांचा हवाला देत रोस्कोमॅनाडझॉर रशियन सरकारवर टीका करीत होते.
 
 
एप्रिलपासून आरटीआय, आरआयए नोव्होस्टी आणि क्रिमिया 24 यासह रशियन सरकारद्वारे चालविल्या जाणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या खात्यावर नियंत्रण आणण्यात आले. आता नवीन सादर झालेल्या विधेयकामध्ये युट्युब, फेसबुक आणि ट्विटरवर बंदी आणण्यासंदर्भात स्पष्टपणे उल्लेख केला आहे. दरम्यान, यासंदर्भात सध्यातरी फेसबुक आणि ट्विटरने कुठलीही प्रतिक्रिया नोंदविलेली नाही. युट्युब व फेसबुककडून रशियन नागरिकांच्या हक्कांचे व अधिकारांचे उल्लंघन झाल्याची अनेक प्रकरणे घडल्यानंतर रशियन सरकारने या माध्यमांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला, असे रॉयटरने आपल्या वृत्तात म्हटले आहे.