‘तेरा यार हूं मैं’कडून कुटुंबामध्ये नवीन सदस्याचे स्वागत

    दिनांक :20-Nov-2020
|
मुंबई, 
सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’ हलक्या-फुलक्या कौटुंबिक कन्टेन्टसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. राजीवने त्याचा मुलगा रिषभचा मित्र बनण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले असताना सर्वांच्या मनामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी कुटुंबामध्ये नवीन सदस्य येणार आहे. मालिका ‘तेरा यार हूं मैं’ सर्वात प्रेमळ जॉनी या पाळीव कुत्र्याला सादर करत आहे. हा नवीन सदस्य निश्चितच प्रेक्षकांना प्रभावित करेल, तसेच मालिकेचे कलाकार देखील या नवीन प्रवेशाबाबत खूपच आनंदी आहेत. या नवीन सह-कलाकाराबाबत त्यांची मते -
 
 
tera yar_1  H x
 
प्रेमळ सह-कलाकारासोबत शूटिंग करण्याच्या अनुभवाबाबत बोलताना जान्हवीची भूमिका साकारणारी श्वेता गुलाटी म्हणाली, मला कुत्रा खूप आवडतो आणि मला त्याच्यासोबत शूटिंग करण्याचा खूप आनंद झाला आहे. मी सांगू शकते की, मी आतापर्यंत काम केलेल्या सर्वोत्तम सह-कलाकारांपैकी तो एक आहे. तो अत्यंत प्रेमळ व उत्तमरित्या प्रशिक्षित आहे. त्याला बोलायला सांगितल्यावर तो भुंकतो आणि कॅमेर्‍यासमोर सर्वोत्तम सीन्स देतो. मला वाटते पहिल्याच नजरेत तो मला खूप आवडला. माझ्या मते, तो कोणत्याही कलाकारापेक्षा उत्तमपणे सादर होतो. ती पुढे म्हणाली, एके दिवशी एक मजेशीर घटना घडली. मी त्याला उचलून घेतले आणि त्याने माझ्या पायावर लघुशंका केली. माझ्या घरी देखील एक कुत्रा आहे. ज्यामुळे तो माझ्या अंगावर माझ्या त्या पाळीव प्राण्याचा सुगंध घेत असेल आणि त्याची जागा घेण्याची इच्छा असेल. पण त्यामुळे मी घरी पोहोचल्यानंतर संकटात सापडले. माझ्या कुत्र्याने माझा वास घेतला आणि तो शोधत होता की, मम्माला कोण भेटलं आणि सोबत आले आहे. असे वाटले की, मी स्वत:लाच फसवले.
 
 
राजीवची भूमिका साकारणारा सुदीप साहिर म्हणाला, मी अशा उत्तमपणे वागणार्‍या कुत्र्याला यापूर्वी कधीच भेटलो नव्हतो. एका सीनमध्ये त्याला मी झोपलेलो असताना माझ्या पायाला चाटत गुदगुदल्या करायच्या होत्या. जॉनीने ते 2 टेक्समध्ये केले आणि आम्ही सर्व अचंबित झालो. मी त्याचे भुंकणे एकदाही ऐकलेले नाही. तो अत्यंत उत्तमरित्या प्रशिक्षित व उत्तमपणे वागणारा कुत्रा आहे. मला कुत्रे आवडतात, पण ते अवतीभोवती असणे माझ्या सवयीचे नाही. पण तो अत्यंत गोंडस आहे.
 
 
रिषभची भूमिका साकारणारा अंश सिन्हा म्हणाला, व्यक्तिश: मला कुत्रे खूप आवडतात आणि म्हणूनच मला खूप आनंद झाला. पहिला दिवस काहीसा अवघड गेला, पण आम्हाला कुत्र्याला समजून घ्यावे लागले. नंतर आम्ही त्याच्यासोबत रूळलो आणि त्याच्यासोबत परफॉर्म व ट्रिक्स करू लागलो. तो अद्भुत आहे आणि त्याच्यासाठी पटकथेमध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी तो लीलया करू शकला. तो अत्यंत प्रामाणिक व उत्तमरित्या वागणारा आहे. तो आम्हा सर्वांशी अगदी प्रेमळपणे वागला. तो पुढे म्हणाला, फक्त त्रिश कुत्र्यांना घाबरते. पण सुदैवाने आतापर्यंत तिचा त्याच्यासोबत सीन नाही. वरूण आणि मी तिची मस्करी करण्याची योजना आखत आहोत, असे ती म्हणाली.