डॉ. धांडे यांच्या विजयासाठी कटिबद्ध व्हा

    दिनांक :21-Nov-2020
|
- प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांचे आवाहन
- भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी बैठक
तभा वृत्तसेवा
अमरावती,
शिक्षकांच्या हक्काचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी भाजपाचा आमदार सभागृहात जाणे आवश्यक असल्याने महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करून भाजपा उमेदवार डॉ. नितीन धांडे यांचा विजय निश्चित करावा, असे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी केले.
 
 
dhande_1  H x W
 
शिक्षक मतदारसंघ निवडणुक प्रचार नियोजनासाठी भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी हॉटेल ग्रँड महफिल येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार, कोषाध्यक्ष शैला मुळक, शहराध्यक्ष किरण पातुरकर, सरचिटणीस गजानन देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य संध्या टिकले, शिल्पा पाचघरे, नैना वासाने, सुरेखा लुंगारे, आसावरी देशमुख, मिना पाठक, रश्मी नावंदर, लता देशमुख, सुचिता बिरे, श्रद्धा गहलोद, छाया अंबाडकर उपस्थित होत्या. उमा खापरे पुढे म्हणाल्या, महिला मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपल्या संपर्कातील शिक्षक मतदाराशी संपर्क करावा. त्यांचे मत डॉ. धांडे यांनाच मिळेल यासाठी प्रयत्न व्हावा. शिक्षकांच्या हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपाचा उमेदवार विधान परिषदेच्या सभागृहात जाणे आवश्यक आहे. डॉ. धांडे यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वास उमा खापरे यांनी व्यक्त केला. अन्य महिला पदाधिकार्‍यांची यावेळी भाषणे झाली. निवडणुक प्रचार मोहिमेवरही बैठकीत सखोल चर्चा झाली.