ई-कचऱ्याचा पुनर्वापर हा ट्रेन्ड व्हावा !

    दिनांक :21-Nov-2020
|
- ग्रामायण प्रतिष्ठानच्या उद्यम गाथेत ई-कचऱ्याचा प्रवास
नागपूर,
ईलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये धातू आणि प्लास्टीकचा पुनर्वापर व्हावा आणि हा एक ट्रेन्ड बनायला हवा. या उत्पादनांमध्ये पाऱ्यासह लीड, प्लास्टीक आणि विविध धातूंचे अंश असतात. ही उत्पादने मातीत मिसळून किंवा जाळल्याने प्रदूषणात वाढच होते. त्यामुळे, शास्त्रीय पद्धतीनेच ई कचऱ्याची विल्हेवाट लावली जायला हवी. आपण वापरलेल्या ईलेक्ट्रॉनिक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आपलीच आहे, हा विचार प्रत्येक नागरिकाने अंगिकारला तर ई कचऱ्याची विल्हेवाट आणि पुनर्वापर हा ट्रेन्ड व्हायला हवा, असे मत महिमा सुरी यांनी व्यक्त केले.
 
 
recy_1  H x W:
 
ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या, उद्यम गाथा मालिकेच्या आठव्या भागात इलेकट्रोनिक्स अभियांत्रिकीच्या विषयात पदवीधर असलेल्या महिमा बोलत होत्या. तंत्रज्ञानात दरदिवशी होणारे बदल आणि नवनवीन उपकरणांची भर पडत असल्यामुळे वाढता ई कचरा आणि त्याची योग्य विल्हेवाट हा नजिकच्या भविष्यातील चिंतेचा विषय झाला आहे. तंत्रज्ञानाने एकीकडे आपली कामे सोपी केली. पण, त्याचसोबत आपल्यासमोर ईकचऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. यावर उपाय म्हणून तंत्रज्ञानाचाच प्रभावी आणि शास्त्रशुद्ध वापर केला जावा, असे त्यांनी स्पष्ट केले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात महिमा सुरी यांनी ई-कचऱ्याच्या वाढत्या समस्येचे निराकरण या विषयावर मार्गदर्शन केले. त्या वर्ष २०१३ पासून, ई-कचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या कंपनीत विपणन प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
 
 
 
हा कचरा प्रक्रीया न करता टाकल्यास, माती-पाणी-हवेचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम एका विशिष्ट भागाला नाही तर संपूर्ण समाजाला थोड्या-अधिक प्रमाणात भोगावेच लागतात. आपल्याला निसर्गासोबतच मानवी आरोग्याची काळजी घेण्याचे उद्दीष्टही आपण ठेवायला हवे. ई-कचऱ्याचा हा विषय नागरिकांप्रमाणेच सरकार आणि व्यवस्थापन यंत्रणेसाठीही नवीन आहे. या पाश्र्वभूमीवर सरकारच्या सहकार्यातून, योग्य प्रक्रीया करूनच ई कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. २०१८ मध्ये नियम अधिक कठोर झाले आहेत. पुनप्र्रक्रीया आणि पुनर्वापर करण्यातूनच बदल होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ई कचऱ्याचे पूर्णत: रिसायकलिंग करून १०० टक्के पुनर्वापर करता येत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, पुनप्र्रक्रीयेदरम्यान कामगार सुरक्षेची काळजी घेतली जाते. नियमांनुसार आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासह आवश्यक ती उपकरणे वापरूनच या उत्पादनांवर प्रक्रीया केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. या संबोधनात त्यांनी ई-कचरा म्हणजे नेमके काय? त्यातून पर्यावरणाला होणारे नुकसान, ई-कचऱ्याची योग्य हाताळणी आणि त्यावरील प्रक्रीया याविषयीची परिपूर्ण माहिती त्यांनी दिली. या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात उपस्थितांनी प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.