सख्ख्या नात्यात विवाह करणे बेकायदेशीर

    दिनांक :21-Nov-2020
|
- उच्च न्यायालयाचा निकाल
चंदीगड, 
पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने काका, मामा, मावशीच्या मुला-मुलींशी विवाह करणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. याचिकाकर्त्याला आपल्या काकांच्या मुलीसोबत विवाह करायचा होता, जी नात्याने त्याची बहीण लागते. मात्र, असा विवाह करणे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले.
 
 
vivah_1  H x W:
 
जेव्हा ही मुलगी 18 वर्षांची होईल तेव्हा ते विवाह करतील. परंतु, तेव्हाही हे बेकायदेशीर असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. 21 वर्षीय तरुणाने 18 ऑगस्टला लुधियाना जिल्ह्याच्या खन्ना शहर-2 ठाण्यात भारतीय दंड संहिताच्या कलम 363 आणि 366 ए अंतर्गत तात्काळ जामिनाकरिता पंजाब सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.
 
 
राज्य सरकारच्या वकिलांनी जामिनाला विरोध केला. मुलगी अल्पवयीन असून, तिचे आणि मुलाचे वडील भाऊ असल्याचे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचिकाकर्त्याने आपले जीवन आणि स्वातंत्र्यासाठी मुलीसोबत फौजदारी याचिका दाखल केली असे तरुणाच्या वकिलांनी न्यायमूर्ती अरविंदसिंह सांगवान यांना सांगितले.
 
 
मुलगी 17 वर्षांची असून, दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये होते असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. आपल्या आईवडिलांकडून त्रास होत असल्याचे मुलीचे म्हणणे आहे. न्यायालयाने याचिकेवर आपला निर्णय दिला. जर तरुण आणि मुलीला सुरक्षेबद्दल शंका असेल तर तात्काळ सुरक्षा देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. पण, हा आदेश याचिकाकर्त्यांना कायद्याचे उल्लंघन करण्यापासून, कायदेशीर कारवाईतून वाचवणार नाही, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.