नितीन राऊतांनी राजीनामा देऊन कारकुनाचे काम करावे

    दिनांक :21-Nov-2020
|
- विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा टोला
तभा वृत्तसेवा
मुंबई,
ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये कारकून म्हणून काम करावे. भाजपा कार्यकर्ते त्यांना वीज देयके दाखवतील, मग ती तुम्ही तपासा असा, खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. ऊर्जामंत्र्यांनी १०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आणि नंतर सोयीस्करपणे घूमजाव केला. आता वीज देयकात सवलत देणार, असे सांगून वीज ग्राहकांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सरकार करीत आहे. ऊर्जामंत्र्यांना अधिकार आहेत, मुख्यमंत्र्यांशी बोलून ते वीज देयके कमी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. केवळ आपली जबाबदारी झटकण्याचे काम ऊर्जामंत्री करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
 
 
pravin_1  H x W
 
शिक्षण क्षेत्राचेही केले नुकसान
या सरकारने शिक्षणाचा बट्याबोळ केला आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. शिक्षण विभागाची प्रत्येक विषयात धरसोड वृत्ती आहे. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही घटकाला विश्वासात न घेता निर्णय घ्यायचा व त्यावर टीका झाली की तो मागे घेण्याचे एकमेव काम शिक्षणमंत्र्यांनी चालविले आहे. सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय आधी घेतला व तो आता फिरविला. स्थानिक प्रशासन निर्णय घेतील असे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले.
 
 
 
जे महाराष्ट्रात सत्तेवर आहेत, त्यांचीच सत्ता मुंबई व ठाणे महापालिकेत आहेत, मग त्या भागातील ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. मग उस्मानाबद, बीड, qहगोली येथील विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाची लागण होण्याची भीती नाही का? त्यांच्याबद्दल वेगळा न्याय का? त्यामुळे या सरकारच्या निर्णयात कुठेही एकवाक्यता नाही, विसंवाद आहे, बिघडलेल्या अवस्थेत हे सरकार असल्याची टीकाही दरेकर यांनी केली. उस्मानाबद मधील श्रीपतराव हायस्कूल मध्ये ५० शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे, मग उद्या येथील विद्याथ्र्यांना कोरोना झाला तर, त्याला जबाबदार कोण आहे. एका बाजूला तुम्ही सांगता कोरोनाची लाट येण्याची भीती आहे आणि दुसèया बाजूला शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात येतो. हा सरकारमध्ये विरोधाभास असल्याचा आरोप त्यांनी केला.