शेतकऱ्यांच्या वीज समस्या तातडीने सोडवा- भावना गवळी

    दिनांक :21-Nov-2020
|
वाशीम,
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या रब्बी हंगामाची सुरुवात झाली असून, त्यामध्ये विजेचा लोड वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रकार वाढत आहेत. परंतु जळालेले टार्न्सफार्मर शेतकरी बांधवाना लवकर दुरुस्त करून मिळत नसल्याच्या तक्रारी शेकडो शेतकर्‍यांनी खासदार भावना गवळी व शिवसेना पदाधिकार्‍याकडे केल्या. तक्रारीची दखल घेत खासदार गवळी यांनी वीज वितरण कंपनीचे अभियंता याच्या दालनात बैठक घेवुन शेतकरी बांधवांच्या ट्रान्सफार्मर चा प्रश्‍न तातडीने सोडविण्याच्या सूचना करून शेतकर्‍यांच्या कामात हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा उपस्थित वीज वितरण कंपनी च्या अधिकारी यांना दिला.
 
 
gavli_1  H x W:
 
जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषिपंप सी.आय. कंपनी व शक्ती यांनी पुरवलेले कृषिपंपच्या यांच्या मोठया प्रमाणावर नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आहेत. कंपनीकडे 5 वर्षाचा मेन्टेनन्स असताना सुध्या खूप प्रकरणे प्रलंबित आहेत. यावर खासदार गवळी यांनी सूचना दिल्या सदर कंपन्या वेळेवर कृषिपंप दुरुस्त करून देत नसेल तर कंपन्यांवर कार्यवाही करावी व सध्या प्रलंबित कृषिपंप तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा, मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषिपंप सर्व समावेशक जिल्ह्यातील 100 टक्के शेतकर्‍यांना योजनेचा लाभ घेता यावा याकरिता नियमावलीत शासनाने बदल करावा आदी विषयावर बैठकीत चर्चा झाली. सदर बैठकीला जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, भाविसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब देशमुख, भागवत गवळी, महादेव सावके, जिप बांधकाम सभापती विजय खानझोडे, कार्यकारी अभियंता चव्हाण, महावितरण चे अधिकारी, कर्मचारी व जिप सदस्य, पस सदस्य बैठकीला उपस्थित होते.