विश्वमांगल्य सभा योजना बैठकीत नवीन दायित्व घोषणा

    दिनांक :21-Nov-2020
|
अंजनगाव, 
श्रीक्षेत्र सुर्जी अंजनगाव येथील श्रीनाथ पीठ, श्रीदेवनाथ मठ येथे शुक्रवारपासून सुरू असलेल्या त्रिदिवसीय सभेच्या नवीन दायित्व घोषणा राष्ट्रीय अध्यक्षा रेखा खंडेलवाल यांनी आज शनिवारी केली.
 
 
vishvamanglya_1 &nbs
 
दिल्ली, राजस्थान आणि गुजरात क्षेत्र संघटन मंत्री म्हणून पूजा देशमुख यांना कार्यभार देण्यात आला आहे. त्यांचे केंद्र दिल्लीत राहील. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा क्षेत्र संघटनमंत्रिपदाचे दायित्व गायत्री लोमटे यांना देण्यात आले. त्यांचे केंद्र भाग्यनगर (हैदराबाद) राहील. गुजरात प्रांत अध्यक्ष धारिणीबेन शुक्ल असून, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र संघटनमंत्री म्हणून सभेच्या महासचिव सोनिया तर्‍हाळकर यांना दायित्व देण्यात आले आहे.
 
 
विदर्भ प्रांत संघटनमंत्रिपदाचे दायित्व तेजसा जोशी यांना प्रदान करण्यात आले. त्यांचे केंद्र नागपूर राहील. विदर्भ प्रांत उपाध्यक्षा म्हणून अर्चना बारब्दे यांची नियुक्ती झाली. मराठवाडा संघटक मंजुषा लोळे यांना वनवासी संपर्क प्रमुख हे दायित्व देण्यात आले. छत्तिसगड प्रांत संयोजिका म्हणून किरण वाघमारे काम पाहतील. यासह विश्वमांगल्य सभेची आगामी विस्तार योजना तयार करण्यात आली. भारतातील एकूण 42 प्रांतातील 32 प्रांतात विश्वमांगल्य सभेच्या विस्तारिका सभेचा कार्यविस्तार करतील. या सुवर्णक्षणी सभाचार्य परमपूज्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, सभाचार्या वंदनीय मायबाई, रविजी भुसारी, अ.भा. अध्यक्षा रेखा खंडेलवाल, अ. भा. संघटनमत्री डॉ. वृषाली जोशी आणि कार्यकर्ता भगिनी उपस्थित होत्या.