ऊर्जामंत्र्यांची आणखी एक फसवी घोषणा

    दिनांक :21-Nov-2020
|
- विश्वास पाठक यांची टीका
मुंबई, 
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलेली 20 हजार कोटी रुपयांची शेतकरी वीज देयक माफीची घोषणा फसवी आहे, अशी टीका भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख तसेच ऊर्जातज्ज्ञ विश्वास पाठक यांनी केली आहे.
 
 
vishvas pathak_1 &nb
 
राज्य सरकार स्वतःच्या खिशातला एक पैसाही बाहेर न काढता, शेतकर्‍यांना वीज देयक माफी देण्याची घोषणा करीत आहे. ही घोषणा म्हणजे शेतकर्‍यांची उघड उघड फसवणूक आहे. शेतकर्‍यांनी थकीत देयके भरले तर, तेवढ्या रकमेचे क्रेडिट सरकार देणार आहे. मुळात शेतकर्‍यांकडे बिल भरण्यासाठी पैसेच नाहीत. विविध कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना थेट मदत करायची सोडून, हे सरकार थकीत देयकात माफी देण्यासारखे हातचलाखीचे खेळ करीत आहे. सरकारच्या मनात खरंच शेतकर्‍यांना मदत करण्याची इच्छा असेल, तर थेट मदत द्या, असेही पाठक यांनी नमूद केले.