सुनील छेत्रीच्या बंगळुरूविरुद्ध एफसी गोव्याची लढत

    दिनांक :21-Nov-2020
|
- इंडियन सुपर लीग
मडगाव, 
नवीन विदेशी खेळाडू व एक नवीन प्रमुख प्रशिक्षक यांच्या समावेशाने नवीन स्वरुप प्राप्त एफसी गोवा संघ आता इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) आपले अभियान नव्या जोमाने सुरु करण्यास उत्सुक आहे. रविवारी फातोर्डा स्टेडियमवर एफसी गोव्याचा पहिला सामना सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील बलाढ्य बंगळुरू एफसीविरुद्ध होणार आहे.
 
 
SUNIL CHHETRI_1 &nbs
 
एफसी गोवाने आतापर्यंत कधीही आयएसएल चषक उंचावले नाही. यंदा ते 2015 व 2018 साली केलेल्या कामगिरीच्या पलिकडचा पल्ला गाठण्यास उत्सुक आहे. या दोन्हीवेळा गोवा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. परंतु एफसी गोवाचे प्रशिक्षक ज्युआन फर्रान्डो यांच्यासाठी विजयाचा मार्ग सोपा राहणार नाही. कारण ज्युआन फेरान्डो यांची एफसी गोवाने नेहमीच्या शैलीत आक‘मकपणेच खेळावे, अशी इच्छा आहे. यापूर्वी प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा एफसी गोवा आक‘मकपणे खेळला आहे.
 
 
गत मोसमात एफसी गोवाने विजेतेपद पटकावले व या विजेतेपदाबरोबरच एफसी गोवा एएफसी चॅम्पियन्स लीगच्या गट साखळी फेरीसाठी भारतातून पात्र ठरणारा पहिला संघ ठरला. तिकडे एफसी बंगळुरूने एकदाच इंडियन सुपर लीग विजेतेपद पटकावले आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा बंगळुरुचा हुकमी आक‘मक खेळाडू असून तोसुद्धा आपल्या संघाची दमदार सुरुवात करण्यास उत्सुक आहे. एकजुट होऊन खेळण्यात बंगळुरु निपूण असून एक मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून इतर संघांसाठी कठीण ठरणार आहे. सुनील छेत्रीमध्ये एकट्याच्या भरवशावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे आणि त्याला सवंगड्याची उत्तम साथ मिळाली, तर बंगळुरु एफसीला पराभूत करणे कठीण राहील. अनुभवी गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू ही बंगळुरू संघाची जमेची बाजू आहे. क्लिटन सिल्व्हा व कि‘स्तियन ऑपसेठ हे आक‘मक खेळाडू बंगळुरुसाठी उत्तम कामगिरी बजावतील अशी आशा आहे.