लोककलावंत डॉ. दिलीप अलोने यांचे देदिप्यमान यश

    दिनांक :21-Nov-2020
|
वणी, 
पाटणचे सुपुत्र, सुप्रसिद्ध नकलाकार, वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. दिलीप अलोने यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतलेल्या, प्रयोगात्मक लोककला पदविका अभ्यासक‘मात घवघवीत यश संपादन केले. त्यांनी ही परीक्षा अमरावतीच्या ज्योतिबा फुले महाविद्यालयातून उत्तीर्ण केली असून विद्यापीठात 400 पैकी 387 गुण घेऊन सर्वप्रथम येण्याचा बहुमानही प्राप्त केला आहे.
 
 
y21Nov Dilip Alone_1 
 
विदर्भासह, संपूर्ण महाराष्ट्रात लोककला लोप पावत असताना, लोककलेला पुनर्जिवित करण्यासाठी डॉ. अलोने अविरत धडपडत असतात. याकरिता त्यांना यापूर्वी विदर्भ साहित्य संघ, महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी वयाच्या 68 व्या वर्षी विद्यापीठाची एखादी परीक्षा देऊन त्यात प्रावीण्य प्राप्त करण्याची आगळीवेगळी नोंद केली आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. मीनल ठाकरे व विभागप्रमुख डॉ. अनंत देव यांनी डॉ. दिलीप अलोने यांचे अभिनंदन केले आहे.