सिराजच्या निर्णयाचे गांगुलीने केले कौतुक

    दिनांक :21-Nov-2020
|
कोलकाता, 
पितृछत्र हरपलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला वडिलांच्या अंत्यविधीसाठी मायदेशी परतण्याचा पर्याय दिला होता, परंतु राष्ट्र कर्तव्यासाठी ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेतला. फुफ्फुसाच्या आजाराने सिराजच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले.
 
 
MOHMMAD SIRAJ_1 &nbs
 
बीसीसीआयने सिराजशी संवाद साधला वया दुःखाच्या प्रसंगी आपल्या कुटुंबासमवेत राहण्यासाठी मायदेशी परतण्याचा प्रस्ताव दिला. मात्र सिराजने राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी भारतीय कि‘केट संघासोबत ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली. बीसीसीआय त्याच्या दुःखात सहभागी असून या अत्यंत आव्हानात्मक अवस्थेत सिराजचे समर्थन करते, असेही ते म्हणाले. हैदराबादच्या वेगवान गोलंदाजाने या दुःखद घटनेदरम्यान घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि त्याच्या मानसिक धैर्याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनेही ट्विट करीत त्याचे कौतुक केले.