ऑस्ट्रेलियात वन-डेमध्ये सर्वाधिक धावा रोहितच्या

    दिनांक :21-Nov-2020
|
मुंबई, 
पायाच्या दुखापतीमुळे भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला नाही, परंतु संघाला त्याची कमतरता निश्चित जाणवेल. कारण त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची आतापर्यंतची कामगिरी उत्तम आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वन-डे सामन्यात सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो आघाडीवर असून त्याने 990 धावा केल्या. सचिन तेंडुलकर 740 धावांसह दुसर्‍या, महेंद्रसिंह धोनी 684 धावांसह तिसर्‍या, तर विराट कोहलीने 629 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
 
 
ROHIT SHARMA-3_1 &nb
 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय कि‘केटमध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावांची नोंद केली असून त्याने या संघाविरुद्ध 71 सामन्यांत 3,077 धावा केल्या. रोहित शर्मा दुसर्‍या स्थानावर असून त्याने 40 वन-डे सामन्यांत 2,208 धावा केल्या. विराट कोहली तिसर्‍या क‘मांकावर असून त्याने आतापर्यंत 40 वन-डे सामन्यांत 1,910 धावा केल्या आहेत.