बाधितांची संख्या वाढतीला

    दिनांक :21-Nov-2020
|
-एकूण बाधित १०८३६३
-कोरोनामुक्त १०१००९
-एकूण मृत्यू ३५८६
नागपूर, 
नागपुरात कोरोना पुन्हा वाढतीला लागला असून मागील २४ तासात नागपूर जिल्ह्यात १६ बाधितांचा मृत्यू झाला. ३६३ जणांना कोरोनाची बाधा झाली. २०८ कोरोनामुक्त झालेत. मागील पाच दिवसांपासून बाधितांचा आकडा वाढतच असून रोजची मृत्यूसंख्याही वाढली वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची शंका वाढली आहे.
 
 
corona_1  H x W
 
आज जिल्ह्यात आरटीपीसीआर पद्धतीने ५२२३, रॅपिड अँटिजन पद्धतीने १६२८, असे एकूण ६८५१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील ६४८८ जणांचे नमुने नकारात्मक आले. खाजगी प्रयोगशाळांत ९०, अँटिजेन पद्धतीने २७, मेयो २६, एम्स २७, मेडिकल प्रयोगशाळेत १५०, रातुम नागपूर विद्यापीठ १५, नीरी १९, पशुवैद्यकीय ९, असे एकूण ३६३ नमुने सकारात्मक आले.
 
 
ग्रामीणमधील ५३, शहरातील ३०५ व जिल्ह्याबाहेरील ५, असे एकूण ३६३ नव्या बाधितांची आज भर पडली. आतापर्यंत ग्रामीणमध्ये एकूण २२१७४, शहरात ८५५२९, जिल्ह्याबाहेरील बाधितांची संख्या ६६०, असे एकूणच कोरोनाबाधितांची संख्या १०८३६३ झाली. सप्टेंबरमध्ये चांगलीच वाढलेली बाधितांची संख्या ऑक्टोबरपासून कमी होऊ लागली. नोव्हेंबरच्या पंधरवाड्यात हे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, १७ नोव्हेंबरपासून रोजच्या बाधितांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. १७ नोव्हेंबरला शहर व ग्रामीण मिळून २६२ बाधित, ६ मृत्यू होते. १८ नोव्हेंबरला शहर व ग्रामीण मिळून ३८९ बाधित, ७ मृत्यू होते. १९ नोव्हेंबरला शहर व ग्रामीण मिळून ४४३ बाधित, मृत्यू १२ होते. २० नोव्हेंबरला शहर व ग्रामीण मिळून ३४४ बाधित, मृत्यू २० होेते.
 
 
आज जिल्ह्यातून २०८ कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १०१००९ कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात ५६३८४ गृहविलगितांचा समावेश आहे. कोरोनामुक्तीचा हा दर ९३.२१ टक्के आहे. मागील २४ तासात ग्रामीणमध्ये ६, शहरात ५ तसेच जिल्ह्याबाहेरील ५, अशा १६ बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ग्रामीणमध्ये ६१२, शहरात २४९६, जिल्ह्याबाहेरील ४७८, असे एकूण ३५८६ बाधितांच्या मृत्यूची संख्या झाली आहे. मृत्यू दर २.८५ टक्केपेक्षा कमी होतो आहे. आज ग्रामीणमध्ये ५२५, शहरातील ३२४३, असे एकूण ३७६८ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी रुग्णालयात १३४२ तसेच २४२६ गृहविलगित आहेत.