ऑस्ट्रेलियन ओपन पुढे ढकलण्याची शक्यता फेटाळली

    दिनांक :21-Nov-2020
|
मेलबर्न,
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा फेबुवारी किंवा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे, असे हेराल्ड सनच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र ऑस्ट्रेलियन ओपन संयोजकांनी हे वृत्त फेटाळून लावले. हा शुद्ध अंदाज आहे, असे संयोजकांनी म्हटले आहे.
 
 
AUSTRAILIAN OPEN_1 &
 
आयोजक व्हिक्टोरिया राज्य सरकारसोबत खेळाडूंच्या विलगीकरणाच्या व्यवस्थेबाबत चर्चा करीत असतानाही यावर्षीच्या पहिल्या ग‘ॅण्ड स्लॅम स्थगित होण्याचा धोका निर्माण झाल्याचे हेराल्ड सन या वृत्तपत्राने म्हटले आहे. पुढल्या वर्षीच्या सुरुवातीच्या काळात आम्ही ऑस्ट्रेलियन ओपनचे आयोजन होईल अशी मला खात्री आहे, असे व्हिक्टोरिया प्रीमियरचे डॅनियल अ‍ॅण्ड्रयू यांनी हेराल्ड सनशी बोलताना सांगितले. स्पर्धेची तारीख, वेळ आणि योग्य व्यवस्था याबाबत निर्णय अद्याप व्हायचा आहे, हे सर्व सुनिश्चित झाल्यानंतर जाहीर करण्यात आम्हाला अधिक आनंद होईल, असेही ते म्हणाले. नियोजित कार्यक‘मानुसार ऑस्ट्रेलियन ओपन दरवर्षी 18 जानेवारीपासून सुरु होते. टेनिसपटूंना जानेवारी महिन्यात पहिले दोन आठवडे विलगीकरणात राहणे अनिवार्य राहील, असे संयोजकांनी म्हटले आहे.