ट्रम्प बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष

    दिनांक :21-Nov-2020
|
- ज्यो बायडेन यांची टीका
वॉशिंग्टन, 
अमेरिकेतील जनतेने ट्रम्प यांना नाकारले असून, याची जाणीव त्यांना आहे. परंतु, पराभव मान्य न करता केलेल्या निराधार आरोपातून ट्रम्प यांनी बेजबाबदारपणा दाखवला आहे, अशी टीका अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली आहे.
 

jyo baiden_1  H 
 
ट्रम्प लोकशाहीचे नुकसान करीत आहे, असे बायडेन म्हणाले. निवडणुकीचे निकाल मान्य न करणे आणि घोटाळ्याचे निराधार दावे करणे यातून अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेवर त्यांचा कधीही विश्वास नव्हता हे दर्शवते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वृत्तीमुळे संपूर्ण जगात अमेरिकन लोकशाहीबद्दल चुकीचा संदेश गेला आहे, अशी बायडेन यांनी केली. मिशिगनविषयी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ट्रम्प यांना सर्वांत बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष असल्याचे म्हटले आहे.
 
 
ट्रम्प पराभूत झाले आहेत व जिंकू शकले नाही याची जाणीव त्यांना होईल. त्यांनी कोणतेही आरोप केले, तरी 20 जानेवारीला शपथविधी होणार असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले. ट्रम्प पराभव स्वीकारण्यास तयार नसल्याने बायडेन यांनी त्यांच्यावर टीका केली. दुसरीकडे ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये दाखल केलेला दावा मागे घेण्याची घोषणा केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. मिशिगनमधील नेत्यांशी ट्रम्प यांनी दूरध्वनीवर चर्चा केली असून, त्यापैकी काहींना व्हाईट हाऊस येथे बोलवण्यात आले आहे. दरम्यान, विस्कॉन्सिन निवडणूक आयोगाने 8,00,000 हून अधिक मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले आहेत.