अमेरिकेचा आरोग्य संघटनेत पुन्हा प्रवेश : बायडेन

    दिनांक :21-Nov-2020
|
-चीनलाही सुनावले
वॉशिंग्टन, 
आपल्या प्रशासनाच्या पहिल्याच दिवसापासून अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेत सहभागी होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली आहे. मागील एप्रिलमध्ये ट्रम्प प्रशासनाने कोरोना विषाणू संसर्गाच्या मुद्यावर चीनची बाजू घेतल्याचा आरोप आरोग्य संघटनेवर करत आपल्या देशाला अलग ठेवले होते.
 
 
biden 2_1  H x
 
ऐन कोरोगा महामारी काळात आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) या आजाराबद्दल संपूर्ण जगाची दिशाभूल केली. यात लाखो लोकांचा बळी गेल्याचा आरोप विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. आता ज्यो बायडेन यांनी म्हटले की, आपल्या प्रशासनाच्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवसापासूनच अमेरिका जागतिक संघटनेत सहभागी होईल. मात्र, त्याचवेळी अन्य देशांनीही एक होणे गरजेचे आहे. चीनला सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे आणि त्यानुसारच काम करावे लागेल, असा इशाराही यावेळी दिला.
 
 
राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचारातील वादविवादा दरम्यान जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनवर आर्थिक प्रतिबंध लागू कराल काय, या प्रश्नावर बायडेन यांनी, चीन ज्याप्रमाणे व्यवहार करत आहे, त्यावरून या देशाला दंड करू इच्छितो. तसेच, त्याला नियमांनुसारच वागावे लागेल आणि हा एक सोपा प्रस्ताव आहे, असे म्हटले होते.
 
 
विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सत्ताकाळात चीनसोबतचे संबंध सर्वांधिक बिघडले असल्याचे दिसून येते. त्यांनी जवळपास सर्वच मुद्यांवर आक्रमक धोरण अवलंबवले होते. यात वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रावर केलेल्या लष्करी वर्चस्वाला आव्हान, कोरोना विषाणूला चीनी व्हायरस असे संबोधन आदींचा समावेश आहे. दरम्यान, आता मात्र दोन्ही महासत्तामधील संबंध पूर्ववत करण्यात बायडेन यांना नक्कीच यश येईल, असा आशावाद चिनी राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.