विश्वविक्रमवीर कोसगेई, येशनेह यांचा प्रवेश निश्चित

    दिनांक :21-Nov-2020
|
- दिल्ली अर्ध मॅराथॉन
नवी दिल्ली, 
विश्वविक्रमवीर बि‘गीड कोसगेई आणि अबाबेल येशनेह यांनी आगामी दिल्ली अर्ध मॅराथॉनसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. या दोघांच्या समावेशाने अर्ध मॅराथॉनमध्ये अन्य स्टार धावपटूंच्या संख्येत भर पडली आहे, असे संयोजकांनी म्हटले आहे. ही अर्ध मॅराथॉन जागतिक अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या गोल्ड लेबलच्या रेसचा एक भाग आहे.
 
 
BRIGID KOSGEI_1 &nbs
 
ऑक्टोबर 2019 मध्ये शिकागो मॅराथॉनमध्ये केनियाच्या कोसगेईने 2 तास 14.04 मिनिट असा नवीन विश्वविक्रम नोंदवित विजेतेपदाचा मान मिळविला होता. येशनेहनेही सुरेख कामगिरी बजावित 2 तास 20.51 मिनिट अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविली होती. गत महिन्यात 26 वर्षीय कोसगेईने लंडन मॅराथॉन 2 तास 18.58 मिनिटात जिंकली. दिल्ली अर्ध मॅराथॉनमध्ये सहभागी होणारे धावपटू 25 ते 29 नोव्हेंबरदरम्यान स्थानिक रस्त्यांवर कधीही सोयीनुसार धावू शकतात.
 
 
 
दिल्ली अर्ध मॅराथॉन ही भारतासाठी अभिमानास्पद बाब असून या अर्ध मॅराथॉनच्या आयोजनासाठी केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य लाभेल. जगातील सर्वोत्तम धावपटूचे देशाच्या राजधानीत स्वागत आहे, असे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. ऑलिम्पिक विजेता अभिनव बिंद्रा या अर्ध मॅराथॉनचा सदिच्छा दूत आहे. कोरोना संकटानंतर एअरटेल दिल्ली अर्ध मॅराथॉन ही ऐतिहासिक घटना आहे. जगात विविध भागात हळूहळू क्रीडा उपक्रमाला सुरुवात झाली आहे. आता दिल्लीत अर्ध मॅराथॉन कशी होईल, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे, असे बिंद्रा म्हणाला.