राधिका देशपांडेच्या ‘त्रिकुट बालनाट्याचे’ चे प्रकाशन

23 Nov 2020 20:01:30
नागपूर, 

u_1  H x W: 0 x 
अभिनेत्री, शिक्षिका, दिग्दर्शिका आणि लेखिका राधिका देशपांडे यांनी लॉकडाऊन काळाचा उत्तम आणि कलात्मक उपयोग करीत लहान मुलांच्या नाटुकल्यांचे पुस्तक लिहिले आहे. त्रिकुट बालनाट्यांचे या शीर्षकांतर्गत मराठी, हिंदी आणि इंग‘जी अशा तीन भाषांमध्ये लिहिण्यात आलेल्या या तीन एकांकिकांच्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात झाले. याप्रसंगी बालरंजनचे संचालक संजय पेंडसे, मुखपृष्ठ चित्रकार सतीश पेंडसे व युवराज शहा यांची प्रामु‘याने उपस्थित होते. राधिका देशपांडे या नागपूरच्या बालरंजन कला मंदिरचे संचालक संजय पेंडसे व सारिका पेंडसे यांच्या कन्या आहे. राधिका सध्या पुण्यात स्थायिक आहेत. त्यांनी दुर्गा झाली गौरी, अचाट गावची अफाट मावशी, जान्हवी, चॉईस इज युवर्स, ती दोघं अशा अनेक नाटकांमध्ये तसेच होणार सून मी ह्या घरची, स्वराज्य रक्षक संभाजी, लक्ष्य, असलेल्या आई कुठे काय करते या मालिकेत भूमिका केल्या आहेत. सध्या त्यांची आई कुठे काय करते या मालिकेतील, देविकाची भूमिका चांगलीच गाजते आहे. कोरोना काळात सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक‘म, नाटक, मालिका यांना चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे कलावंतांचेही बरेच कलात्मक आणि आर्थिक नुकसान झाले. सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना राधिकाने या लॉकडाऊन काळाचा अतिशय सकारात्मक रितीने उपयोग बालकांसाठी एकांकिका लिहिल्या आहेत. ‘त्रिकुट’ याआधी राधिकाची कटीपतंग आणि 3 बालनाट्ये, मुंगळे चार आणि बालनाट्ये 3 आणि मॅगीश अशी तीन बालनाट्याची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्रिकुट बालनाट्याचे हे त्यांचे चौथे पुस्तक असून ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातील तीन एकांकिका या तीन भाषांमध्ये म्हणजे मराठी, हिंदी आणि इंग‘जीत आहेत.
Powered By Sangraha 9.0