'तो' गेला तेव्हा 'ती' सडा रांगोळी करीत होती!

    दिनांक :29-Nov-2020
Total Views |
- प्रफुल्ल व्यास
वर्धा, 
ते कुटुंब अतिशय सामान्य, सर्वांसोबत मिळून मिसळून नव्हे सर्वांना आपुलकीचे आणि आपले वाटणारे... अशा परिवारावर कोणतेही संकट आले तरी सारा वेटाळ एक आल्याशिवाय राहत नाही... घटना तशी शहरातलीच पण वातावरण गावातले, आपले आणि आपुलकीने राहणारे! त्या परिवारावर कोरोनाची वाईट दृष्टी पडली आणि अघटीतच घडले... पण, राव न करी ते गाव करी या युक्तीचा येथे अनुभव आला. सारे त्यांच्या मागे उभे होते. तो निघून गेला! पण, ‘तीङ्क त्यापासून कोसो दूर होती.
 

a_1  H x W: 0 x 
 
कोरोनाने साधरणत: अनेक घरातील वयोवृद्धांना गाठले. घरचा व्यक्ती गेल्याचे दु:ख प्रत्येकालाच होतं. अनेक साठीतले रुग्णालयात तपासणीसाठी गेले आणि घरी परतलेच नाही. पिपीई किटमधून आलेल्या रुग्णालयातील कर्मचाèयांनीच आपल्या माय, बाप, भाऊ, बहिणीला आपल्या डोळ्या देखत अग्नी दिला. वर्धेत कोरोना जेव्हा चढत्या आलेखावर होता तेव्हा आर्वी नाका परिसरातील एका वस्तीतील एका घरावर कोरोनाची वक्रदृष्टी पडली. त्याचे आई, वडील, पत्नी, आठ आणि चार वर्षांची दोन मुलं म्हणजे अख्खे कुटुंबच कोरोनाबाधित झाले. अगदी विदर्भातील इतर जिल्ह्यात कोरोना रुग्ण तिहरी आकडा गाठत होते तेव्हा वर्धा पन्नाशीत होते. या कालखंडात आर्वी मार्गावरील एका परिसरातील त्या कुटुंंबावरच कोरोनाने आक्रमण केले..
 
तेव्हा आणि आताही कोरोनाविषयी फारसे भीती वाटत नव्हती. स्वत: स्वत:ची जबाबदारी हाच उपाय अनेकांनी केला. प्रशासनानेही त्यासाठी हातभार लावला. चार मोठे आणि दोन लहान असे सहा जण कोरोना बाधित झाले. या सहा जणांपैकी घरातील तरुणावर मात्र कोरोनाचे आक्रमण जरा मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. कोरोनाचे इतर रुग्णही जसे रुग्णालायत गेले तसेच तोही गेला.
 
वध्र्यात कोरोनातून मुक्त होणाèयांची संख्या कोरोना होणाèयांएवढीच जवळपास समान असल्याने त्याच्या घरचे त्या विषयी फारसे गांभीर नव्हते. त्या घरातील सर्वच कोरोनाबाधित झाल्याने शेजारच्यांचा तसा थेट संपर्क होऊ शकत नव्हता. मात्र, त्याला रुग्णालयात सकाळचा चहा आणि नाश्ता तसेच दोन्ही वेळचे जेवन पोहोचवण्याची जबाबदारी परिसरातील युवकांनी घेतली. घरच्यांना घराबाहेर निघणेच शक्य नसल्याने शेजारधर्म सर्व पाळू लागले. प्रत्येक जण आप आपले काम नियमित करीत होते. एक दिवस ‘त्याङ्क चाळीशीतल्या धिप्पाडावर कोरोना हावी झाला आणि नियतीने आपला डाव साधला.
 
देव त्याला देवा घरी घेऊन गेला खरे! पण, त्याच्या घरी हे सांगायचे कुणी आणि कसे? असा प्रश्न सर्वांनाच पडला. अखेर, त्याच्या बहिणी आणि जवळचे नातेवाईक आले. त्यांनी सर्व जबाबदारी सांभाळत घरी पत्नी, दोन मुलं आणि आई, वडिलांना भनकही लागू न देता शेजाèयापाजाèयांनी मनाचा दगड करून त्याच्या अन्त्यसंस्काराला हजेरी लावली. एवढे सारे होत असताना परिसरातील नागरिकांनी वाèयालाही खबर लागू दिली नाही.
 
अन्त्यसंस्कारानंतर ते कुटुंब कोरोनातून मुक्त होईलस्तोवर कोणालाच सांगायचे नाही, असे ठरले. त्यानुसार त्याच्या घरातून रोज ठरलेल्या वेळी चहा, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण जाऊ लागले. प्रकृती नगरगरम असल्याचे सांगितल्या जाऊ लागले. सर्व क्रीयाकर्म केले. एकीकडे क्रीयाकर्म सुरू असता त्याची पत्नी, दोन्ही मुलं आणि आई वडील नियमित कामात होते. पत्नी नेहमीप्रमाणे सडा, रांगोळी करीत होती. हे पाहून शेजारच्यांनी अश्रू डोळ्यातच दाबून ठेवले. त्याचा तेरावा, चौदावा कुठेतरी कसा तरी झाला! घरचे कोरोनातून बाहेर आले आणि तो गेल्याचे घरी सांगितले. साèया घराने टाहो फोडला. सांत्वन करण्याचे शब्द कुणाकडेच नव्हते. सारे कसे निशब्द झाले होते.