दौर्‍याच्या प्रदीर्घ काळाबाबत विचार करावा : कोहली

    दिनांक :06-Nov-2020
|
दुबई,
जैव-सुरक्षित वातावरणात क्रिकेटपटूंना ताजेतवाणे राहणे मानसिकदृष्ट्या कठीण असू शकते. कोरोना नियमानुसार संरक्षित वातावरणात सामान्यपणे खेळण्यासाठी दौर्‍याच्या प्रदीर्घ काळाबाबत विचार केला पाहिजे, असे मत भारतीय कि‘केट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
 

virat ab_1  H x 
 
इंडियन प्रीमियर लीगनंतर भारतीय संघ लगेच प्रदीर्घ काळासाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार आहे. अर्थात ते एका जैव सुरक्षित वातावरणातून अन्य जैव-सुरक्षित वातावरणात खेळणार आहेत. 27 नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. त्यानंतर 4 डिसेंबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका व त्यानंतर 17 डिसेंबर ते 19 जानेवारीदरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
 
 
 
जैव-सुरक्षित वातावरणातील प्रत्येक गोष्ट चांगली आहे. उत्तम व्यवस्था आहे. त्यामुळेच आम्ही सर्वजण एकत्र खेळण्याचा आनंद लुटत आहो, परंतु ऑस्ट्रेलियात पुन्हा जैव-सुरक्षित खेळणे कठीण आहे, कारण ही पुनरावृत्ती आहे, असे तो म्हणाला. भारतीय संघातील बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी झाले असून हे सर्वजण ऑगस्ट महिन्यापासून संयुक्त अरब अमिरातमध्ये आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा नववर्षापर्यंत चालेल. अर्थात भारतीय खेळाडू चारपेक्षा अधिक महिन्यांपासून घराबाहेरच राहतील व बाह्यजगाशी त्यांचा थोडाफार संबंध असेल.
 
 
प्रदीर्घ काळाच्या दौरा कार्यक्रमामुळे थकवा येऊ शकतो, कारण जैव-सुरक्षित वातावरणाचा खेळाडूंना त्रास होऊ शकतो. एक-समान वातावरणात 80 दिवस खेळल्याने खेळाडूंच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल, याचा विचार व्हायला पाहिजे, असे तो म्हणाला.