आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराट भावूक

    दिनांक :07-Nov-2020
|
अबुधाबी, 
आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून रॉयल चॅलेंजर्स बंगलोळुरूचा ६ गड्यांनी पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली अतिशय भावूक झाला. यंदाही आयपीएल qजकू न शकल्याची खंत व्यक्त केली.


b_1  H x W: 0 x
 
चाहत्यांचे प्रेम, पाठबळ आम्हाला मजबूत बनवते. आपल्या प्रेमासाठी आभारी आहे. आपण लवकरच भेटूया, असे त्याने म्हटले आहे.
कोहलीने आपल्या बंगळुरू संघातील सहकाèयांची प्रशंसा केली. तो म्हणाला की, चांगल्या व वाईट परिस्थितीत आम्ही एकमेकांसोबत होतो. आम्ही एकसंघ राहून खेळलो व आमचा आयपीएलचा प्रवास चांगला राहिला. मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे.
 
केन विल्यम्सनचा झेल सोडणे आम्हाला महागात पडले. देवदत्त पडिक्कलने सीमारेषेवर विल्यम्सनचा झेल पकडला होता, मात्र सीमारेषेबाहेर जात असल्याने त्याने तो झेल सोडला. मात्र त्याने पाच धावा वाचवल्या. सामना qजकायचा म्हटले की संधीचे सोने करावे लागते. जर तो झेल पकडला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा राहिला असता. केन मैदानावर असल्याने हैदराबादचा विजय सोपा झाला, असे तो म्हणाला.