कोहलीने पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी

    दिनांक :07-Nov-2020
|
- गौतम गंभीरची टीका
नवी दिल्ली, 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. तेराव्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही आरसीबी चषक उंचावू शकला नाही. शुक्रवारी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गड्यांनी धुव्वा उडविला. या पराभवानंतर कोहलीवर टीका होऊ लागली असून भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज गौतम गंभीरने कोहलीला आरसीबीच्या कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.
 

b_1  H x W: 0 x 
 
भारताच्या दोन विश्वचषकात qसहाचा वाटा उचलणारा गौतम गंभीर परखड भाष्य करण्यात प्रसिद्ध आहे. तो म्हणाला की, कोहलीला आता कर्णधार पदावरुन हटवायला हवे. आठ वर्षांपासून तो संघाचा कर्णधार आहे, मात्र यादरम्यान त्याने एकदाही संघाला आयपीएल चषक qजकून दिले नाही. आठ वर्षे खूप जास्त आहेत.
 
मला अशा कर्णधाराविषयी सांगा, कर्णधार सोडा अशा खेळाडूविषयी सांगा जो ८ वर्ष एखाद्या टीममध्ये आयपीएल qजकल्याविना राहिला आहे. आर. अश्विनकडे बघा. त्याने दोन वर्षे qकग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले, पण तो qजकू शकला नाही म्हणून लगेच त्याला कर्णधारपदावरून हटविण्यात आले, असेही तो म्हणाला.
 
कर्णधार म्हणून कोहलीचे नाव आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधार असलेले महेंद्रqसह धोनी व रोहित शर्मासारखे नसावे. पाचव्यांदा आयपीएल qजकू पाहणाèया रोहितला मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून दीर्घकाळ काम करणे शक्य झाले, कारण त्याने तशी कामगिरी करून दाखविली. धोनीने चेन्नई सुपर qकग्जला तीनेळा आयपीएल चषक qजकून दिले. तेव्हा काही विशिष्ट लोकांसाठी वेगवेगळी मापदंड नसावे. बहुदा कोहली आपला पराभव स्वीकारण्यास राजी नसल्याचे वाटते. जेव्हा तुम्ही कर्णधार असता, तेव्हा संघाच्या यशाचे श्रेय कर्णधारालाच मिळते, तसेच पराभवाची जबाबदारीही कर्णधाराने स्वीकारायला हवी, असेही तो म्हणाला.