आत्मविश्वास बळावलेल्या हैदराबादची लढत संघर्षरत दिल्लीशी

    दिनांक :08-Nov-2020
|
अबुधाबी, 
आत्मविश्वास बळावलेला सनरायजर्स हैदराबाद रविवारी होणाèया इंडियन प्रीमियर लीगच्या दुसèया क्वॉलिफायर सामन्यात संघर्षरत दिल्ली कॅपिटल्सवर विजय नोंदविण्यास उत्सुक आहे. हैदराबाद संघाने योग्यवेळी जोरदार मुसंडी मारीत आयपीएलमध्ये आपली आगेकूच केली आहे. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा सर्वच विभागात त्यांची स्थिती बळकट झाली आहे. गत दोन आठवड्यातील दोन्ही प्रतिस्पर्धी संघाचे चित्र विरोधाभासी दिसत आहे.
 
 
A_1  H x W: 0 x
 
एकीकडे डेव्हिड वॉर्नर व त्याच्या सहकाèयांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने हैदराबादच्या यशाची कमान उंचावताना दिसते, तर तिकडे दिल्ली कॅपिटल्सच्या यशाला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. पहिल्या नऊ सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ गंभीर दिसला व त्यांनी पूर्वार्धात सात सामने qजकलीत, मात्र त्यानंतरच्या पुढील सहापैकी पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
 
 
सद्यस्थितीत युवा श्रेयस अय्यर तेराव्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्लीचे नेतृत्व करू इच्छित आहे, तर तिकडे डेव्हिड वॉर्नर आपल्या २०१६ सालच्या विजेतेपदावर आणखी चांदीचा मुलामा चढविण्याच्या मानसिकतेत नाही. २०१६ मध्ये हैदराबादने पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. २०१८ मध्ये हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. खरे तर पुढील दोन सामने qजकल्यास वॉर्नर या आयपीएलमधील अधिक अननुभवी संघांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरू शकतो.
दिल्ली कॅपिटल्ससाठी qचतेची बाब म्हणजे त्यांची फलंदाजीची अव्वल फळी.
 
विशेषतः पहिले तीन स्थान जिथे शिखर धवनने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने १५ सामन्यात ५२५ धावांची नोंद केली आहे. मात्र पृथ्वी शॉची तंत्रशुद्ध फलंदाजी अव्वल दर्जेदार वेगवान गोलंदाजांविरुद्ध अपयशी ठरली, तर अजिंक्य रहाणेने आतापर्यंत केवळ एकवेळा उल्लेखनीय कामगिरी केली. भोपळा न फोडता बाद होणाèया फलंदाजांची संख्या प्रशिक्षक रिकी पॉण्टिंगला qचतेत टाकणारी आहे.
 
दिल्लीच्या गोलंदाजीच्या विभागाने काही क्षणी उत्कृष्ट गोलंदाजी केली, परंतु नंतर मुंबईच्या फलंदाजांनी आपल्या धावांचा वेग वाढविला. बहुतांश सामन्यात कॅगिसो रबाडा (२५ बळी), अ‍ॅनरिच नॉर्टिज (२०) व रविचंद्रन अश्विनने (१३) प्रभावी कामगिरी केली.
तिकडे सनरायजर्स हैदराबादची फलंदाजी गत काही सामन्यात वेगवान ठरली आहे. अष्टपैलू जेसन होल्डरनेही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही प्रारंभापासून आक्रमक फलंदाजी केली व त्याला वृद्धिमान साहाला उत्तम साथ लाभली. जॉनी बेअरस्टोनेही अफलातून कामगिरी केली व मनीष पांडेनेही आपली लय कायम राखली आहे, असे होल्डर दिल्लीविरुद्धच्या व्यूहरचनेविषयी बोलताना म्हणाला.
 
आम्हाला श्रीवस्त गोस्वामीवर विश्वास आहे व त्याचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे, असे तो म्हणाला. होल्डरने सहा सामन्यात १३ बळींची नोंद केली आहे. रशिद खानची माफक गोलंदाजी, टी. नटराजनची वैविध्यपूर्ण गोलंदाजी तसेच संदीप शर्माची चेंडू स्विंग करण्याची क्षमता, ही वॉर्नरच्या संघासाठी जमेची बाजू आहे.
 
दिल्ली कॅपिटल्सची कमकुवत बाजू न्हणजे त्यांच्या मधल्या फळीतील दोन अननुभवी फलंदाज- प्रियम गर्ग व अब्दुल सामद आहे. डॅनियल सॅम्सने गोलंदाजीत टूकार प्रदर्शन केले आहे. त्याच्या जागी शिमरॉन हेटमायरला स्थान देण्याची शक्यता आहे, कारण तो फलंदाजीसुद्धा उपयोगी ठरू शकेल. रबाडा, नॉर्टिज, अश्विन व अक्षर पटेल यांच्यासमवेत मार्कस स्टोइनिससुद्धा गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.
- प्रतिस्पर्धी संघ -
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कॅएॅगिसो रबाडा, मार्कस स्टोइनिस, संदीप लामीचाने, ईशांत शर्मा, अqजक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अ‍ॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, अमित मिश्रा, अ‍ॅनरिच नॉर्टिज, डॅनियल सॅम्स.
 
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट qसग, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल सामद, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी. संदीप, संजय यादव, फॅबियन अ‍ॅलन, पृथ्वी राज यारा, खलिल अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन्.
आज दुसरा क्वॉलिफायर सामना
दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद
स्थळ : शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी
वेळ : सायंकाळी ७.३० वाजतापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्वर